परीक्षेचा निकाल आयबीपीएस कडून बँकेस प्राप्त
परीक्षेचा निकाल बँकेच्या वेबसाईटवर उपलब्ध
सिंधुदुर्गनगरी : प्रतिनिधी
सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या लिपिक पदाच्या ७३ रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सनल सिलेक्शन (आयबीपीएस) मार्फत राबवण्यात आली होती. सदर भरती प्रक्रियेसाठी एकूण ५०७३ उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. यापैकी २४८५ उमेदवार परीक्षेत उपस्थित राहिले होते. सदर उमेदवारांचा परीक्षा निकाल आयबीपीएस कडून बँकेस प्राप्त झाला आहे. सदर यादी बँकेच्या वेबसाईटवर (https.sindhudurgdcc.bank.in) पाहण्याकरीता उपलब्ध करून देण्यात आला आहे. यापैकी बँक धोरणानुसार एकूण गुणांपैकी ५०% गुण प्राप्त करणाऱ्या उमेदवारांची१:३ या प्रमाणात एकूण २३४ उमेदवार मुलाखतीकरिता पात्र ठरले आहेत. पात्र उमेदवारांच्या मुलाखती दि.१७/०४/२०२६ पासून बँकेच्या प्रधान कार्यालयात आयोजित करण्यात येणार आहेत. सदर मुलाखतीसाठीचे कॉल लेटर (मुलाखत पत्र)संबंधित उमेदवारांच्या नोंदणीकृत ई-मेलवर आयडीवर पाठवण्यात येणार आहे.त्यामुळे संबंधित उमेदवारानी आपला ईमेल आयडी नियमितपणे तपासावा असे आव्हान बँकेतर्फे करण्यात येत आहे. मुलाखतीसाठी येताना उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रांच्या मूळ प्रती व छायांकीत प्रती सोबत आणणे बंधनकारक आहे.अशी माहीती बँकेचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.









