कंटेनरने दुचाकीला चिरडले; दोघे जखमी
मुंबई गोवा महामार्गावर उद्यमनगर जवळ अपघात
कुडाळ : प्रतिनिधी
मुंबई गोवा महामार्गावर कुडाळ उद्यमनगर नजिक सिंधु केअर हाॅस्पिटल समोर कंटेनर व दुचाकीत भिषण अपघात झाला. कंटेनरने दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात दुचाकीस्वार महिला तसेच कंटेनर चालकाला दुखापत झाली आहे. हा अपघात आज शुक्रवारी सायंकाळी सहा वाजताच्या सुमारास झाला. जखमींना येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. कंटेनर लेनवर फिरला असून अपघातस्थळी वाहतूक विस्कळीत झाली आहे.









