ठळक घडामोडी

पणदूर हायस्कूलचा बारावीचा निकाल ९८.६६ टक्के!

कुडाळ : प्रतिनिधी
        वेताळ बांबर्डे विभाग शिक्षण प्रसारक मंडळ संचलित दादासाहेब तिरोडकर कनिष्ठ महाविद्यालय गुरुवर्य कै. शशिकांत अणावकर सर विद्यानगरी पणदूरतिठा या हायस्कूलचा बोर्ड परीक्षा इ. १२ वी (एच.एस.सी ) २०२६ चा निकाल ९८.६६ टक्के एवढा लागला. प्रशालेतून फेब्रुवारी मार्च २०२६ मध्ये झालेल्या इयत्ता बारावी ( एच. एस. सी. ) परीक्षेत तिन्ही शाखेत मिळून एकूण २९९ विद्यार्थी बसले पैकी २९५ विद्यार्थी उत्तीर्ण होऊन निकाल ९८.६६ टक्के लागला.
कला विभाग –
प्रथम – कु.  साक्षी सुरेश वरक ५२२ / ८७.०० टक्के
द्वितीय – कु.  रेणुका राजन पावसकर ४३८ / ७३.०० टक्के
तृतीय – कु. ऐश्वर्या शिलवंत दुर्वे ४३१ / ७१.८३ टक्के
विज्ञान विभाग
प्रथम – कु. वासुदेव विनायक बिले ५०८ / ८४.६७ टक्के
द्वितीय – कु. भक्ती नागेश आईर ४९९ / ८३.१७ टक्के
तृतीय – कु. वंदना मंगेश पवार ४९६ / ८२.६७ टक्के
वाणिज्य विभाग
प्रथम – कु. प्राची प्रविण कदम ५११ / ८५.१७ टक्के
द्वितीय – कु. निशांत संतोष परब ४९६ / ८३.५० टक्के
तृतीय – कु. तन्वी संदिप शेलटे ४८७ / ८१.१७ टक्के
    सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्था चेअरमन आपा गावडे, संस्था सचिव नागेंद्र परब, उपाध्यक्ष प्रकाश जैतापकर व संस्था पदाधिकारी संचालक, आणि मुख्याध्यापक एम. जी. कर्पे तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वर्ग यांनी सर्व विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले.

error: Content is protected !!