ठळक घडामोडी

देवगड येथे १४ एप्रिल रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना


संविधानिक विचार मंच देवगड यांच्‍या वतीने जय‍ंतीचे आयोजन

देवगड : प्रतिनिधी

  संविधानिक विचार मंच देवगड यांच्‍या वतीने १४ एप्रिल,२०२६ रोजी महामानव डॉ.बासाहेब आंबेडकर यांच्‍या जय‍ंतीचे आयोजन करण्‍यात आले असून देवगड तहसीलदार यांचे सांस्‍कृतिक मंचावर डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना देण्‍यात येणार आहे. देवगड तहसीलदार यांचे सांस्‍कृतिक मंचावर १४ एप्रिल रोजी सायंकाळी ५.०० ते रात्री ९.०० यावेळेत जयंती कार्यक्रम होणार असून यानिमित्‍त “संविधान समजून घेताना” या विषयावर व्‍याख्‍याते अॅड.रोशन पाटील यांचे व्‍याख्‍यान आयोजित करण्‍यात आलेले आहे.
या जयंती कार्यक्रमाचे औचित्‍य साधून सर्वसामान्‍य जनतेचे तह‍सीलदार आणि उत्‍तम प्रशासक रमेश पवार यांचा विशेष सन्‍मान सत्‍कार करण्‍यात येणार आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना विविध गीतातूंन आदरांजली व्‍हाण्‍यासाठी संगीतमय भीम गीतांचा नजराणा “गीत भिमायन” कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमासाठी संविधान प्रेमींनी मोठया संख्‍येने उपस्थित रहाण्‍याचे आवाहन संविधान विचार मंचाचे अध्‍यक्ष श्री.के.एस.कदम यांनी केले आहे.

error: Content is protected !!