ठळक घडामोडी

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त शाळा क्रमांक ३ येथे वृक्षारोपण…!

नगरसेविका सुप्रिया नलावडे यांचा पर्यावरण संवर्धनाचा संदेश

कणकवली : प.पू. भालचंद्र महाराज शाळा क्रमांक ३ येथे वृक्षारोपण करताना नगरसेविका सुप्रिया नलावडे यांच्यासमवेत राज नलावडे, शीतल निखार्गे, स्मिता कामत आदी. (छाया : अनिकेत उचले)

कणकवली : प्रतिनिधी
      जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून कणकवली नगरपंचायतीच्या प्रभाग क्रमांक ७ मधील नगरसेविका सुप्रिया नलावडे यांच्या वतीने प.पू. भालचंद्र महाराज शाळा क्रमांक ३ येथे वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात पार पडला. पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत शाळेच्या परिसरात विविध फळ, फुलझाडे व शोभेच्या रोपांची लागवड करण्यात आली.
        यावेळी आंबा, चाफा, कनेर आदी रोपे लावून परिसर हिरवागार करण्याचा संकल्प करण्यात आला. नगरसेविका सुप्रिया नलावडे यांच्या हस्ते वृक्षारोपणाचा शुभारंभ करण्यात आला. विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणाबाबत जागृती निर्माण करण्यासह वृक्षसंवर्धनाचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले.
या कार्यक्रमास सामाजिक कार्यकर्ते राज नलावडे, शीतल निखार्गे, स्मिता कामत, रवी सावंत, यश्मीत पिळणकर, निल म्हसकर, तुषार मोरये आदी उपस्थित होते.

error: Content is protected !!