ठळक घडामोडी

झाराप येथे १३ जूनला ‘लव्ह जिहाद’चे वाढते संकट आणि त्यावरील उपाययोजना यावर विशेष व्याख्यान!

हिंदु जनजागृती समितीचे आयोजन; सामाजिक व कायदेशीर पैलूंवर होणार चर्चा

मुलांसह पालकांनी उपस्थित राहण्याचे आयोजकांचे आवाहन

कुडाळ : प्रतिनिधी
       राज्यात सातत्याने उघडकीस येणारी ‘लव्ह जिहाद’ची नवनवीन आणि धक्कादायक प्रकरणे पाहता, समाजातील वाढती चिंता दूर करण्यासाठी आणि नागरिकांना या धोक्यापासून सतर्क करण्यासाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने एका विशेष मार्गदर्शनपर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. हा विशेष कार्यक्रम शनिवार, १३ जून २०२६ रोजी दुपारी ३ वाजता, मुंबई – गोवा महामार्गावरील झाराप येथील ‘हॉटेल आराध्य’च्या सभागृहात (झिरो पॉईंट) पार पडणार आहे, अशी माहीती हिंदु जनजागृती समितीच्या वतीने देण्यात आली.
      या ज्वलंत विषयाचे गांभीर्य आणि त्यावरील ठोस उपाययोजना यांवर मार्गदर्शन करण्यासाठी मुख्य वक्ते म्हणून हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि ‘लव्ह जिहाद’ विषयावरील ग्रंथाचे लेखक श्री. रमेश शिंदे उपस्थित राहणार आहेत. त्यांच्यासोबतच सनातन संस्थेच्या सद्गुरु स्वाती खाडये आणि मुंबई येथील प्रखर हिंदुत्ववादी कार्यकर्त्या व विधीतज्ज्ञ अधिवक्त्या (सौ.) प्रीती राऊत या देखील उपस्थितांना सविस्तर कायदेशीर व वैचारिक मार्गदर्शन करतील.
       आपल्या मुलींचे भविष्य सुरक्षित करण्यासाठी सर्व हिंदू बांधव, युवक-युवती, माता-भगिनी आणि विशेषतः पालकांनी आपल्या मुलींना सोबत घेऊन या व्याख्यानाला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन हिंदु जनजागृती समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

error: Content is protected !!