८ जुलैपर्यंत नागरिकांना हरकती-सूचना मांडता येणार
कुडाळ : प्रतिनिधी
महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम, 1966 च्या कलम 26 (1) नुसार नियुक्त अधिकारी सहाय्यक संचालक, नगररचना, सिंधुदुर्ग शाखा यांनी कुडाळ शहराचा प्रारुप विकास आराखडा 9 जून 2026 रोजी प्रसिध्द केला आहे. सदरहू योजनेसंबंधीचे नकाशे व अहवाल नागरीकांच्या अवलोकनार्थ कुडाळ नगरपंचायत येथे उपलब्ध आहेत. नागरीकांनी ही सुचना महाराष्ट्र शासनाच्या राजपत्रात प्रसिध्द झालेल्या दिनांकापासून 30 दिवसांच्या आत म्हणजे 8 जुलै पर्यंत कुडाळ नगरपंचायत, कुडाळ या कार्यालयाकडे प्रारुप विकास योजनेतील तरतुदीसंबंधी सुचना/हरकती लेखी स्वरुपात कारणांसह कुडाळ नगरपंचायत येथे कार्यालयीन वेळेत सादर कराव्यात असे आवाहन न.पं.च्या मुख्याधिका-यांनी केले आहे.









