दोघांविरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल; पोलीस तपास सुरू
मालवण : महेश कदम
मालवण दांडी येथे घराचे बांधकाम चालू असताना एका महिलेला शिवीगाळ करत तिला मारहाण केल्याप्रकरणी मालवण पोलीस स्थानकात दोघां विरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत संबंधित महिलेने मालवण पोलीस स्थानकात तक्रार दिली आहे. सदर महिलेच्या घराचे बांधकाम सुरु असताना एका महिलेने तेथील कामगारांना शिवीगाळ केली. त्यानंतर तिने आपल्या मुलांना तिथे बोलावून घेतल्यावर त्यांनी तक्रारदार महिलेला हातांच्या थापटाने मारहाण केली. महिलेच्या तक्रारीवरून पोलिसांनी दोघांविरुद्ध विरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल केला आहे. तर मारहाणीत जखमी झालेल्या महिलेवर ओरोस येथे जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत. अधिक तपास सुरू आहे, अशी माहीती मालवण पोलीस ठाण्यातून देण्यात आली.









