ठळक घडामोडी

करलकरांनी वैभव नाईकांवर बोलू नये; शिवसेना (उबाठा) तालुकाप्रमुख राजन नाईकांचा पलटवार!

‘कमिशन एजंट’चा गंभीर आरोप; जुना इतिहास बाहेर काढण्याचा राजन नाईकांचा इशारा

कालेली पोटनिवडणुकीत उबाठा शिवसेनेचे वर्चस्व कायम; मतपेटीतून विरोधकांना चोख उत्तर – कृष्णा धुरी

कुडाळ : प्रतिनिधी
      शिंदे शिवसेनेच्या उपजिल्हाप्रमुख अरविंद करलकर यांनी शिवसेना (उबाठा) माजी आमदार वैभव नाईक यांच्यावर काही दिवसांपूर्वी टीका केली होती. त्या टीकेचा समाचार घेत शिवसेना (उबाठा) कुडाळ तालुका प्रमुख राजन नाईक यांनी करलकर यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे.
        कुडाळ येथे आज मंगळवारी आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना तालुकाप्रमुख राजन नाईक म्हणाले की, ज्यांना स्वतःच्या गावातून साधे ग्रामपंचायत सदस्य म्हणूनही निवडून येता आलेले नाही, त्यांनी माजी आमदार वैभव नाईक यांच्यावर बोलू नये. शिंदे सेनेचे उपजिल्हाप्रमुख अरविंद करलकर यांच्या कथित व्हायरल क्लिपमधून त्यांचे ‘कमिशन एजंट’चे व्यवहार समोर आले आहेत. त्यांनी जर अशीच नाहक टीका चालू ठेवली, तर त्यांचा सर्व जुना इतिहास पुराव्यासहित बाहेर काढू, असा इशारा श्री. नाईक यांनी देत ऑडिओ क्लिप पत्रकार परिषदेमध्ये लावून दाखवली.
      कालेली ग्रा.पं. पोटनिवडणुकीत ‘शिवसेना उबाठा’ची सत्ता कायम!
         कुडाळ तालुक्यातील कालेली ग्रामपंचायतीच्या प्रतिष्ठेच्या ठरलेल्या पोटनिवडणुकीत शिवसेना (उबाठा)ने आपले वर्चस्व कायम राखले आहे. गेल्या १५ वर्षांची परंपरा मोडीत काढण्यासाठी भाजप आणि शिंदे सेनेने सरपंच फोडून आपल्याकडे नेण्यासाठी जोरदार प्रयत्न केले होते. यावर बोलताना शिवसेना (उबाठा) कुडाळ तालुकाप्रमुख कृष्णा धुरी म्हणाले की, आमचा सरपंच फोडून नेणाऱ्यांना कालेलीच्या जनतेने या पोटनिवडणुकीत मतपेटीतून चोख उत्तर दिले आहे. ग्रामस्थांनी आणि कार्यकर्त्यांनी विरोधकांचे मनसुबे उधळून लावले असून ‘गाव पॅनेल’च्या माध्यमातून आमचा हक्काचा सरपंच निवडून आणला आहे. तर सततची फोडाफोडी आणि राजकीय अस्थिरतेला कंटाळून पक्षाचे चिन्ह बाजूला ठेवून, गावातील चांगल्या आणि एकनिष्ठ माणसांना एकत्र आणून ही निवडणूक लढवली गेली, असे ठाकरे शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख अमरसेन सावंत यांनी स्पष्ट केले.

error: Content is protected !!