ठळक घडामोडी

युवासेना प्रमुख आ. आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त कुडाळात ५००० वृक्ष लागवड मोहिमेस सुरुवात!

माजी आमदार वैभव नाईक यांच्या हस्ते झाला शुभारंभ

युवासेना जिल्हाप्रमुख मंदार शिरसाट यांच्या पुढाकाराने ठाकरे शिवसेना, युवासेनेचे आयोजन

कुडाळ : प्रतिनिधी
         शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, युवासेना प्रमुख,आमदार आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे व युवासेना कुडाळ यांच्या वतीने आणि युवासेना जिल्हाप्रमुख मंदार शिरसाट यांच्या पुढाकाराने कुडाळ शहरात  ५००० झाडांची वृक्षारोपण मोहीम राबविण्यात  येत आहे. याचा शुभारंभ माजी आमदार, शिवसेना जिल्हाप्रमुख वैभव नाईक यांच्या हस्ते आज शनिवारी श्री महालक्ष्मी मंदिर येथे वृक्षारोपण करून करण्यात आला. यामध्ये बेल, आवळा, जरूळ, करंज, महोगनी, शेवगा, बहवा, चिंच, कुसुमी, कांचन, पळस यांसारखी झाडे लावण्यात येत आहेत. कुडाळ शहरातील भूजल पातळी वाढवण्यासाठी आणि वाढते प्रदूषण रोखण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात येत आहे.
         याप्रसंगी युवासेना जिल्हाप्रमुख, नगरसेवक मंदार शिरसाट, ठाकरे शिवसेना तालुकाप्रमुख कृष्णा धुरी व राजन नाईक, तालुका संघटक बबन बोभाटे, युवतीसेना जिल्हाप्रमुख नीनाक्षी शिंदे, जि. प. सदस्य गंगाराम सडवेलकर, युवासेना तालुकाप्रमुख योगेश धुरी, कुडाळ संपर्कप्रमुख अतुल बंगे, युवासेना उपतालुकाप्रमुख स्वप्निल शिंदे, उपशहर प्रमुख गुरु गडकर, शहर निरीक्षक सुशिल चिंदरकर,युवासेना शहर समन्वयक अमित राणे,उपशहर प्रमुख शैलेश काळप, शाखाप्रमुख पप्या धुरी, संतोष अडुळकर, विनय पालकर, केदार काळप, महेश राहुल, प्रकाश कांबळे, हर्षद काळप, संजय बोभाटे, महेश कांबळे, जेष्ठ नागरिक भाऊ पाटणकर, प्रथमेश राणे, सतीश कुडाळकर, नितीन सावंत, वकील शिवप्रसाद सामंत व शिवसैनिक उपस्थित होते.

error: Content is protected !!