ठळक घडामोडी

शिवसेना (उबाठा) पक्षाच्या कणकवली शहरप्रमुख पदी महेश कोदे यांची निवड!

सिंधुदुर्ग जिल्हाप्रमुख माजी आम. वैभव नाईक यांनी दिले नियुक्ती पत्र

कणकवली : प्रतिनिधी
            शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार सिंधुदुर्ग जिल्हाप्रमुख माजी आमदार तथा जिल्हाप्रमुख वैभव नाईक यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या  कणकवली शहरप्रमुख पदी महेश दिवाकर कोदे यांची नियुक्ती केली आहे. कणकवली विजय भवन येथे आज महेश कोदे यांना नियुक्ती पत्र देऊन पुढील वाटचालीसाठी त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या.
         यावेळी शिवसेना (उबाठा) कणकवली विधानसभा प्रमुख, युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक, महिला जिल्हाप्रमुख निलम पालव, नगरसेवक संकेत नाईक, नगरसेवक जयेश धुमाळे, कणकवली महिला तालुकाप्रमुख वैदेही गुडेकर, संजना कोलते, माधवी दळवी, दिव्या साळगावकर, तेजस राणे, विलास गुडेकर, अजित काणेकर, प्रतिक रासम, बाबू जाधव, रीना जोगळे, राजश्री सावंत, सुमित राणे, रोहित गावडे आदींसह शिवसैनिक उपस्थित होते.

error: Content is protected !!