ठळक घडामोडी

पणदूर येथील अपघातात पावशीतील युवक गंभीर!

मुंबई – गोवा महामार्गावर वेताळबांबर्डे पुलानजिक दुचाकीचा अपघात

कुडाळ : प्रतिनिधी
      मुंबई – गोवा महामार्गावरील पणदूर येथे दुचाकी अपघातात दुचाकीस्वार समर्थ शेलटे (वय २०, रा.पावशी शेलटेवाडी) हा युवक गंभीर जखमी झाला. हा अपघात सोमवारी सायं.५ वाजताच्या सुमारास झाला.
       मिळालेल्या माहितीनुसार, सदर दुचाकीस्वार युवक आपल्या ताब्यातील दुचाकी घेऊन पणदूर येथून पावशीच्या दिशेने येत होता. दरम्यानच्या वेळी वेताळबांबर्डे पुलाच्या नजिक पणदूर येथे तो दुचाकीसह महामार्गावर जखमी अवस्थेत पडलेला वाहनधारकांना दिसून आला. नागरिकांनी त्याला कुडाळच्या ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. तेथे त्याच्यावर प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी तातडीने ओरोस येथील जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आल्याची माहीती ग्रामीण रूग्णालयाच्या वैद्यकीय सुत्रांनी दिली. मात्र अपघात नेमका कसा झाला याबाबतची माहीती समजू शकली नाही. अपघाताची माहीती मिळताच कुडाळ पोलिसांनी रूग्णालयात जाऊन अपघाताची माहीती घेतली.

error: Content is protected !!