कुडाळ भाजप शहराध्यक्ष सुनिल बांदेकर यांचे मुख्याधिकाऱ्यांना निवेदन
प्रभागनिहाय तांत्रिक अधिकाऱ्यांसोबत बैठकीची मागणी
कुडाळ : प्रतिनिधी
कुडाळ नगरपंचायत प्रशासनामार्फत विकास आराखडा (डी.पी.) प्रसिद्ध करण्यात आला आहे. मात्र या आराखड्यातील शहरातील आरक्षण (झोन) तसेच नवीन सुधारित रस्त्यांबाबत स्थानिक नागरिकांमध्ये संभ्रम आणि शंका निर्माण झाल्या आहेत. या पार्श्वभूमीवर प्रभागनिहाय बैठका आयोजित करून तांत्रिक अधिकाऱ्यांमार्फत नागरिकांच्या शंकांचे निरसन करण्यात यावे, अशी मागणी माजी नगरसेवक तथा भाजपाचे कुडाळ शहराध्यक्ष सुनिल बांदेकर यांनी न.पं. प्रशासनाकडे केली आहे.
श्री.बांदेकर यांनी मुख्याधिका-यांना दिलेल्या नमूद केले आहे की, दिनांक 11 जून 2026 रोजी कुडाळ शहराचा विकास आराखडा (D.P) नगरपंचायत इमारतीच्या तळमजल्यावर प्रसिद्धी साठी लावण्यात आलेला आहे. सदरील विकास आराखडा बघता त्यामधील, कुडाळ शहरातील आरक्षण (झोन) व नवीन सुधारित रस्ते याबद्दल स्थानिक ग्रामस्थानमध्ये शंका व संभ्रम निर्माण झालेला आहे. या शंकांचे निरसन करण्याकरीता प्रभागनुसार विकास आराखडाबद्दल तांत्रिक अधिकाऱ्यांसमवेत बैठक आयोजित करून ग्रामस्थांच्या शंकांचे निरसन करावे, अशी मागणी माजी नगरसेवक तथा भाजपाचे कुडाळ शहराध्यक्ष सुनिल बांदेकर यांनी न.पं.च्या मुख्याधिका-यांकडे निवेदनातून केली आहे.









