ठळक घडामोडी

आमदार निलेश राणेंच्या हस्ते कुडाळात उद्या विकासकामांचा शुभारंभ!

कुडाळ : प्रतिनिधी
     कुडाळ शहरातील विविध विकासकामांचा भूमिपूजन व लोकार्पण सोहळा उद्या गुरुवार, दि. 18 जून रोजी आयोजित करण्यात आला आहेत. या कार्यक्रमांना शिवसेना आमदार निलेश राणे प्रमुख उपस्थित राहणार असून त्यांच्या हस्ते विविध विकासकामांचा शुभारंभ करण्यात येणार आहे.
      यामध्ये शहराच्या सांस्कृतिक, क्रीडा आणि नागरी सुविधांशी संबंधित महत्त्वाच्या प्रकल्पांचा समावेश आहे. सकाळी 11.15 वाजता कुडाळ येथील रंगकर्मी मच्छीन्द्रनाथ कांबळी नाट्यगृहाच्या कामाचा भूमिपूजन सोहळा, त्यानंतर सकाळी 11.30 वाजता तालुका क्रीडांगणासाठी संरक्षक भिंत बांधकामाच्या कामाचे भूमिपूजन करण्यात येणार आहे.
दुपारी 12 वाजता कुडाळ नगरपंचायत हद्दीतील सांगिर्डेवाडी येथे उद्यान विकसित करण्याच्या कामाचा शुभारंभ होणार असून, दुपारी 12.30 वाजता कुडाळ शहरातील देवाची पाणंद रस्त्याच्या लोकार्पण सोहळा होणार असल्याची माहीती आमदार निलेश राणेंच्या संपर्क कार्यालयातून देण्यात आली आहे.

error: Content is protected !!