रंगकर्मी मच्छिंद्रनाथ कांबळी नाट्यगृहासाठी १० कोटींचा निधी; आ.राणेंच्या हस्ते भूमिपूजन
कुडाळच्या विकासासाठी आणखी प्रकल्प; एमआयडीसीत रणजी दर्जाचे क्रिकेट मैदान उभारणार – आ.राणे
कुडाळ : प्रतिनिधी
रंगकर्मी मच्छिंद्रनाथ कांबळी नाट्यगृह हे अत्याधुनिक आणि सर्व सुविधा असलेले नाट्यगृह बनवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. त्यामुळेच या नाट्यगृहाच्या अपूर्ण कामासाठी पहिल्या टप्प्यात दहा कोटी निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे असे आमदार निलेश राणे यांनी सांगून या निधीवर कोणाचा डोळा असेल तर मला सांगा हे काम पारदर्शकपणे झाले पाहिजे असे त्यांनी प्रशासनाला सांगितले.
कुडाळ शहरामध्ये रंगकर्मी मच्छिंद्रनाथ कांबळी नाट्यगृह 2019 पासून सुरू आहे. या नाट्यगृहाला कोट्यावधी रुपये खर्च झाले आहेत मात्र अजूनही ते नाट्यगृह अपूर्ण होते हे नाट्यगृह अत्याधुनिक स्वरूपात व्हावे म्हणून आमदार निलेश राणे यांनी प्रयत्न केले होते. वैशिष्ट्यपूर्ण योजनेतून उपमुख्यमंत्री व नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी या नाट्यगृहासाठी पहिल्या टप्प्यात दहा कोटी रुपये निधी मंजूर केला आहेत. या उर्वरित कामाचे भूमिपूजन आज गुरुवारी आमदार निलेश राणे यांच्या हस्ते झाले. यावेळी जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, उपनेते संजय आंग्रे, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष काका कुडाळकर, संजय पडते, जिल्हा परिषद उपाध्यक्ष दादा साईल, उपजिल्हाप्रमुख अरविंद करलकर, ओंकार तेली, तालुकाप्रमुख विनायक राणे, दीपक नारकर, माजी जिल्हा परिषद सदस्य संजय भोगटे, नगराध्यक्ष प्राजक्ता बांदेकर, उपनगराध्यक्ष किरण शिंदे, मालवण उपनगराध्यक्ष दीपक पाटकर, गटनेता विलास कुडाळकर, नगरसेविका सौ संध्या तेरसे, माजी नगराध्यक्ष आफरीन करोल, अक्षता खटावकर, नगरसेवक अभिषेक गावडे, राजीव कुडाळकर, उदय मांजरेकर, निलेश परब, गणेश भोगटे, नगरसेविका नयना मांजरेकर, श्रुती वर्दम, मुख्याधिकारी विनायक औंधकर तसेच भाजप शिवसेनेचे कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी आमदार निलेश राणे यांनी सांगितले की कुडाळ शहर हे जिल्ह्यातील सगळ्यात मोठ्या प्रमाणात विकसित होणारे शहर आहे या ठिकाणी तशा सुविधा देण्याचे काम लोकप्रतिनिधी म्हणून माझ्यासह नगरसेवकांचे आहे आणि त्या दृष्टीने या शहरासाठी लागणारा निधी उपलब्ध करून देत आहे या नाट्यगृहाचे अर्धवट राहिलेले काम पूर्ण करण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पहिल्या टप्प्यात दहा कोटी निधी मंजूर केला आहे दुसऱ्या टप्प्यामध्ये साडेतीन कोटी रुपये या नाट्यगृहासाठी येणार आहेत. हा निधी चांगल्या प्रकारे खर्चित करून हे नाट्यगृह अत्याधुनिक स्वरूपात उभे करण्याची जबाबदारी सर्वांची आहे असे सांगून पुढील काळात रणजी खेळण्यासाठी जे मैदान हवे आहे तसे मैदान एमआयडीसीमध्ये होणार आहे त्यासाठी उद्योग मंत्री उदय सामंत यांनी हिरवा कंदील दाखवला आहे. अशाप्रकारे विविध योजना शहरांमध्ये घेऊन येण्याचा आमचा मानस आहे त्यासाठी सर्वांनी एकत्र राहून काम करण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.
नगराध्यक्षा बांदेकर-शिरवलकर यांनी नाट्यगृहासह विविध विकासकामांसाठी भरीव निधी मिळवून दिल्याबद्दल आमदार निलेश राणे यांचे विशेष आभार मानले. १० कोटी रुपयांचा निधी पहिल्या टप्प्यासाठी देण्यात आला आहे. या पहिल्या टप्प्यात नाट्यगृहाची स्टेज व्यवस्था, अत्याधुनिक साउंड सिस्टम आणि दर्जेदार बैठक व्यवस्था यांसह विविध कामे केली जातील, अशी ग्वाही नगराध्यक्षा बांदेकर-शिरवलकर यांनी दिली.
गार्डन व संरक्षण भिंतीचे झाले भूमिपूजन!
वैशिष्ट्यपूर्ण योजनेतून तहसील कार्यालयाने जीत असलेल्या क्रीडांगणासाठी संरक्षण भिंत बांधण्यात येणार आहे. याचे भूमिपूजन आमदार निलेश राणे यांचे हस्ते झाले तसेच सांगिर्डेवाडी येथील गार्डनचे भूमिपूजन व हायमास्टचे उद्घाटन आमदार निलेश राणे यांच्या हस्ते झाले.









