ठळक घडामोडी

कुडाळ काॅलेज नजिकचा धोकादायक वीज पोल तात्काळ हटवा – सुनील बांदेकर

भाजपाचे शहराध्यक्ष सुनिल बांदेकर यांचे महावितरणला निवेदन

बाजारपेठेतील वीजपुरवठा सुरळीत करण्याचीही केली मागणी

कुडाळ : प्रतिनिधी
        कुडाळ संत राऊळ महाराज महाविद्यालय ते हॉटेल कोकोनट दरम्यानच्या रस्त्यालगत धोकादायक स्थितीत असलेला वीज पोल तात्काळ हटविण्यात यावा, तसेच कुडाळ बाजारपेठेतील वारंवार खंडित होणारा वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी भाजपचे कुडाळ शहराध्यक्ष सुनील बांदेकर यांनी महावितरण प्रशासनाकडे निवेदनातून केली आहे.
     श्री. बांदेकर यांनी निवेदनात म्हटले आहे की, काॅलेज चौक ते हाॅटेल कोकोनट दरम्यान संबंधित रस्त्याच्या दुसऱ्या बाजूची साईडपट्टी खचल्यामुळे रस्ता अरुंद झाला आहे. तर दुस-या बाजूला असलेल्या वीज पोलामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत असून दोन मोठी वाहने समोरासमोर आल्यास वारंवार वाहतूक कोंडी होत आहे. त्यामुळे वाहनचालक व नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. याची दखल घेत सदरचा वीज खांब तात्काळ हटवावा, अशी मागणी त्यांनी केली आहे. तसेच कुडाळ बाजारात वारंवार विद्युत पुरवठा खंडित होत असतो. याबाबत सुद्धा महावितरणने कर्मचाऱ्यांना योग्य त्या सूचना २४ तास विना खंडित विद्युत पुरवठा होण्यासंदर्भात आपल्याकडून योग्य ते उपाययोजना करण्यात याव्यात,अशी मागणी श्री.बांदेकर यांनी केली आहे.

error: Content is protected !!