ठळक घडामोडी

ग्राहकांना स्मार्ट वीज मीटरची सक्ती नको; अन्यथा शिवसेना स्टाईल आंदोलन करू!

कुडाळ शिवसेना शहरप्रमुख अभिषेक गावडे यांचा महावितरणला इशारा

स्मार्ट मीटर बाबत वीज ग्राहकांना पूर्व कल्पना देण्याची मागणी

कुडाळ : प्रतिनिधी
      वीज ग्राहकांच्या घरांमध्ये स्मार्ट वीज मीटर बसविताना संबंधित ग्राहकांना पूर्वकल्पना देण्यात यावी तसेच ग्राहकांना स्मार्ट मीटरची सक्ती करू नये, अन्यथा शिवसेना स्टाईल आंदोलन छेडले जाईल, असा इशारा शिवसेना कुडाळ शहरप्रमुख तथा नगरसेवक अभिषेक गावडे यांनी महावितरण प्रशासनाला दिला आहे.
    महावितरणच्या कार्यकारी अभियंत्यांना दिलेल्या निवेदनात श्री.गावडे यांनी म्हटले की, वीज ग्राहकांच्या घरी स्मार्ट वीज बसविण्याचे काम मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. हे स्मार्ट मिटर बसविताना संबंधीत ग्राहकाला कोणतीही पूर्व कल्पना किंवा सुचना न देता हे स्मार्ट मिटर बसविले जात आहेत. त्यामुळे ग्राहकांमध्ये कमालीची नाराजी पसरली आहे. महावितरणकडून हे स्मार्ट मिटर बसवित असताना संबंधीत ग्राहकांना पूर्व कल्पना देण्यात यावी. सक्ती करू नये. अन्यथा शिवसेना स्टाईलने उत्तर दिले जाईल याची महावितरणने दखल घ्यावी आणि स्मार्ट मिटर बसविताना उचित खबरदारी घ्यावी, असा इशारा शिवसेना शहरप्रमुख अभिषेक गावडे यांनी दिला आहे.

error: Content is protected !!