कुडाळ शहर शिवसेनेच्या वतीने गुणवंत विद्यार्थीसह सेवा देणाऱ्या व्यक्तींचा सन्मान
खा.नारायण राणे यांच्या वाढदिवसानिमित्त शहरप्रमुख अभिषेक गावडे यांच्या संकल्पनेतून उपक्रम
कुडाळ : प्रतिनिधी
आपल्या माणसांसाठी काहीतरी देणं आपण लागतो आणि त्या भावनेतून जेव्हा आपण मदत करतो ही दानशूर पणाची भावना जनतेच्या मनावर कायम कोरली जाते असे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी सांगून शहर प्रमुख अभिषेक गावडे यांची मदत करण्याच्या भावनेमुळेच एवढी लोक उपस्थित राहतात असे कुडाळ शहर शिवसेनेच्या आयोजित विद्यार्थ्यांच्या गुणगौरव व मोफत छत्री वाटप कार्यक्रमांमध्ये उद्गार काढले.
लोकनेते, माजी मुख्यमंत्री व विद्यमान खासदार नारायण राणे यांच्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त कुडाळ शहर शिवसेनेच्या वतीने शहरातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार तसेच सेवा बजावणाऱ्या रिक्षा व्यवसायिक, बांधकाम कामगार, दिव्यांग, निराधार महिलांचा सन्मान करून मोफत छत्री वाटप कार्यक्रम आज रविवारी कुडाळ येथे जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. यावेळी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संजय पडते, काका कुडाळकर, उपजिल्हाप्रमुख अरविंद करलकर, ओंकार तेली, तालुकाप्रमुख दीपक नारकर, सभापती मिलिंद नाईक, नगराध्यक्ष प्राजक्ता बांदेकर, शहर प्रमुख अभिषेक गावडे, गटनेता विलास कुडाळकर, नगरसेवक राजीव कुडाळकर, आफरीन करोल, चांदणी कांबळी, गणेश भोगटे, युवा सेना शहर प्रमुख आबा धडाम, माजी नगरसेविका प्रज्ञा राणे, साक्षी सावंत, रेवती राणे, चर्मकार संघाचे पंढरीनाथ चव्हाण, श्रमिक कामगार संघाचे संस्थापक प्राजक्त चव्हाण, राकेश नेमळेकर, प्रथमेश केळबाईकर, प्रथमेश कांबळी, चंदन कांबळी, योगेश काळप, राजाराम गडेकर तसेच शिवसेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी सांगितले की, कुडाळ शहर प्रमुख पद अभिषेक गावडे यांना दिल्यापासून शहरांमध्ये संघटना बांधण्याचे काम त्यांनी जोरदार सुरू केले आहे. विविध घटकांचे कार्यक्रम त्यांनी घेऊन या घटकांना संघटनेशी जोडण्याचे काम केले आहे. आपल्याजवळ एखादी गोष्ट असेल तर ती गोष्ट दुसऱ्याला देण्याची भावना मनात असावी लागते. नेहमी लोकांना मदत करत राहणारा माणूस कधीच लोकांच्या मनातून उतरत नाही. महिला बचत गटांचा कार्यक्रम तसेच आता घेतलेला गुणवंत विद्यार्थ्यांसह रिक्षा व्यवसायिक, बांधकाम कामगार, दिव्यांग, निराधार महिलांचा सन्मान हे सगळे कार्यक्रम जनतेशी निगडित आहेत. त्याच्यासोबत असलेले सोबती सुद्धा त्याच्या या कार्यामध्ये हातभार लावत आहे. हे कौतुकास्पद आहे. संघटना बांधण्यासाठी ही मंडळी काम करत आहे. असे त्यांनी यावेळी सांगितले.
या कार्यक्रमांमध्ये श्रीदेवी केळबाई मित्र मंडळाचा विशेष सत्कार करण्यात आला हे मंडळ ज्या ठिकाणी महाप्रसाद वाटप करण्याची सेवा करायची असेल त्या ठिकाणी हे मंडळ मोफत निस्वार्थ भावनेने सेवा करत असतात. म्हणून या मंडळाचा सत्कार करण्यात आला. तसेच पंढरपूर येथे रथाचे काम करणारे सिद्धेश नाईक, कट्टर राणे समर्थक माजी उपसरपंच विलास वराडकर, ४२ वेळा रक्तदान करणारे रिक्षाव्यवसायिक अविनाश पाटील, यांचे सत्कार करण्यात आले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नागेश नेमळेकर यांनी केले. तर आभार चांदणी कांबळी यांनी मानले.










