ठळक घडामोडी

मालवण एसटी आगाराच्या ताफ्यात ५ नव्या बसेस दाखल!

आ. निलेश राणे यांच्या पाठपुराव्याला यश; मालवणला मिळाल्या नव्या एसटी बसेस

प्रवाशांना अधिक सुरक्षित, आरामदायी आणि दर्जेदार प्रवास सुविधा

मालवण : प्रतिनिधी
      मालवण बसस्थानकाच्या ताफ्यात ‘राजमाता जिजाऊ’ या नव्या पाच बसेस दाखल झाल्या असून लवकरच त्या प्रवाशांच्या सेवेत रुजू होणार आहेत. या नव्या बसेसमुळे मालवण तालुक्यातील प्रवाशांना अधिक सुरक्षित, आरामदायी आणि दर्जेदार प्रवास सुविधा उपलब्ध होणार आहे.
     आमदार निलेश राणे यांच्या सातत्यपूर्ण मागणी आणि पाठपुराव्यातून या बसेस मालवण बसस्थानकाला प्राप्त झाल्याची माहीती मालवण शिवसेनेकडून देण्यात आली. तसेच यापुढे आणखीही नव्या बस प्राप्त होतील, असे शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी सांगून याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, खासदार नारायण राणे, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, पालकमंत्री नितेश राणे, आमदार निलेश राणे यांचे आभार मानले आहेत.
     या नव्या बसेस सेवेत दाखल झाल्यानंतर मालवण आगाराच्या वाहतूक व्यवस्थेला बळकटी मिळणार असून प्रवाशांची गैरसोय मोठ्या प्रमाणात दूर होणार असल्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

error: Content is protected !!