ठळक घडामोडी

आमदार निलेश राणेंकडून आंब्रड धरणाची पाहणी!

धरणात पाणीसाठा सुरू; सिंचन कालवे वर्षभरात पूर्ण करण्याचे आदेश

२९ वर्षे रखडलेला प्रकल्प पूर्णत्वास; आ.निलेश राणेंच्या पाठपुराव्याला यश

सिंधुदुर्ग : प्रतिनिधी
     गेली २९ वर्षे अपूर्णावस्थेत असलेला आंब्रड सारमळे धरण आमदार निलेश राणे यांनी विधानसभेत प्रश्न उपस्थित केल्यानंतर युद्धपातळीवर काम करून पूर्णत्वास गेले असून धरणाच्या घळभरणीसहित धरणाचे १०० टक्के काम पूर्ण करण्यात आले आहे. या धरणात पाणीसाठा करण्यास देखील सुरुवात झाली असून गेली २९ वर्ष अपूर्णावस्थेत असलेले धरण बांधकाम पूर्ण झाले त्या पार्श्वभूमीवर आमदार निलेश राणे यांनी आज गुरूवारी आंब्रड येथे जाऊन धरणाची प्रत्यक्षात पाहणी केली. तसेच पुढील सिंचन कालव्यांच्या कामाचा आढावा घेतला. पुढील एक वर्षाच्या आत कालव्यांचे काम पूर्ण करून सिंचनासाठी पाणी उपलब्ध करून देण्याची सुचना आमदार निलेश राणे यांनी अधिकाऱ्यांना दिली. यावेळी आमदार निलेश राणे यांनी या धरणाचा प्रश्न उपस्थित करून लकरात लवकर काम पूर्ण करून घेतल्या बद्दल सारमळेवाडी ग्रामस्थांनी आमदार निलेश राणे यांचे आभार व्यक्त केले आहेत. यावेळी जि.प.उपाध्यक्ष दादा साईल यांच्यासह स्थानिक पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.

error: Content is protected !!