ठळक घडामोडी

आवळेगाव येथे बालकांच्या नियमित लसीकरण कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन!

कुडाळ : प्रतिनिधी
     प्राथमिक आरोग्य उपकेंद्र, आवळेगाव येथे आज रविवारी ५ वर्षांखालील बालकांसाठी नियमित लसीकरण कार्यक्रम उत्साहात पार पडला. या कार्यक्रमात आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांनी शासनाच्या लसीकरण वेळापत्रकानुसार बालकांना पल्स पोलिओ डोस देण्यात आला.
     या कार्यक्रमाला आवळेगावच्या सरपंच सौ. पूर्वा सावंत यांनी उपस्थित राहून आरोग्य विभागाच्या कार्याला सहकार्य केले. तसेच पालकांनी आपल्या बालकांचे वेळेवर व नियमित लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन त्यांनी केले.
     यावेळी किर्लोस-ओरोस कृषी महाविद्यालयाच्या विद्यार्थीनी विशाखा सूर्याजी, दुर्गा मोडक, कीर्ती गुरव, सायली धुरी आणि सृष्टी बोले यांनी लसीकरण प्रक्रियेचे प्रत्यक्ष निरीक्षण केले. यावेळी त्यांना बालकांच्या आरोग्य संरक्षणासाठी लसीकरणाचे महत्त्व, तसेच ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य उपकेंद्राची भूमिका याविषयी प्रत्यक्ष माहिती व अनुभव मिळाला. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी आरोग्य कर्मचारी, आशा सेविका आणि अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले. पालकांनीही उत्स्फूर्त प्रतिसाद देत आपल्या बालकांचे लसीकरण करून घेतले.

error: Content is protected !!