
नगराध्यक्ष प्राजक्ता बांदेकर-शिरवलकर यांच्या हस्ते शुभारंभ
डेंग्यू-मलेरियाला आळा घालण्यासाठी कुडाळ नगरपंचायतीची मोहीम
कुडाळ : प्रतिनिधी
कुडाळ नगरपंचायतीच्या वतीने शहरात डास प्रतिबंधक फवारणीचा शुभारंभ आज सांगिर्डेवाडी येथे नगराध्यक्ष प्राजक्ता बांदेकर-शिरवलकर यांच्या हस्ते करण्यात आला.
पावसाळ्यामध्ये दरवर्षी नगरपंचायतीच्या वतीने डास प्रतिबंध फवारणी केली जाते. यावेळी या डास प्रतिबंध फवारणीचा शुभारंभ सांगिर्डेवाडी मधून करण्यात आला. घरोघरी जाऊन ही डास प्रतिबंध फवारणी नगरपंचायतीच्या कर्मचाऱ्यांच्या वतीने करण्यात आली. या शुभारंभावेळी नगराध्यक्ष प्राजक्ता बांदेकर-शिरवलकर, माजी नगराध्यक्ष विनायक राणे, गटनेता विलास कुडाळकर, शिवसेना शहर प्रमुख तथा नगरसेवक अभिषेक गावडे, अॅड.राजीव कुडाळकर, नगरसेविका श्रुती वर्दम तसेच स्थानिक नागरिक उपस्थित होते.ही फवारणी प्रत्येक वॉर्डनिहाय केली जाणार आहे असे नगराध्यक्ष प्राजक्ता बांदेकर-शिरवलकर यांनी यावेळी सांगितले.









