ठळक घडामोडी

कुडाळ पोलिसांची धडक कारवाई; तिघे जण तीन जिल्ह्यांतून हद्दपार!

गोवा बनावटी दारू तस्करांना पोलिसांचा दणका

विविध गुन्ह्यातील तिघांना एक वर्षासाठी जिल्हा बंदी

कुडाळ : प्रतिनिधी
      कुडाळ तालुक्यातील विविध गुन्ह्यातील तीन जणांना सिंधुदुर्गसह रत्नागिरी व कोल्हापूर या तीन जिल्ह्यातून एका वर्षासाठी हद्दपार करण्यात आले आहे. कुडाळ प्रांताधिकारी यांच्या या आदेशाची अंमलबजावणी करीत कुडाळ पोलिसांनी ही कारवाई केली आहे.
    मिळालेल्या माहितीनुसार, कुडाळ पोलिसांच्या रेकॉर्ड वर नोंद असलेल्या एकूण तीन जणांवर ही हद्दपारीची कारवाई करण्यात आली आहे. यातील दोघांवर गोवा बनावटी दारूची वाहतूक केल्याप्रकरणी गुन्हे दाखल आहेत. विविध गुन्हे दाखल असलेल्या या तिघांविरुद्ध कुडाळ पोलिसांनी प्रांताधिकाऱ्यांकडे हद्दपारीचा प्रस्ताव पाठवला होता. यावर कुडाळ प्रांताधिकाऱ्यांनी निकाल देत तिघांनाही सिंधुदुर्ग सह रत्नागिरी व कोल्हापूर या तीन जिल्ह्यातून हद्दपार करण्याचा आदेश दिला आहे. या आदेशाची अंमलबजावणी कुडाळ पोलिसांकडून करण्यात आली आहे.

error: Content is protected !!