ठळक घडामोडी

पालकमंत्री नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त तुळसुलीत गोसेवा; गोशाळेला ३१ हजारांची मदत!

भाजप कुडाळ मंडलाचा गोसेवा कार्यक्रम; गोशाळेतील गायींच्या संगोपनासाठी आर्थिक सहाय्य

कुडाळ : प्रतिनिधी
     पालकमंत्री नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त गोसेवा करून वाढदिवस साजरा करण्याच्या त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत भारतीय जनता पार्टीच्या कुडाळ मंडलाच्या वतीने आज तुळसुली येथील श्रीकृष्ण आनंदवन गोशाळेत गोसेवा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
     या गोशाळेत सध्या ८५ भाकड गायींचे संगोपन केले जात असून त्यांच्या चारा व देखभालीसाठी भारतीय जनता पार्टीच्या वतीने ३१ हजार रुपयांची आर्थिक मदत गोशाळेचे संचालक आनंद वारंग आणि सहकाऱ्यांकडे सुपूर्द करण्यात आली. यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, जिल्हा सरचिटणीस रणजित देसाई, जिल्हा उपाध्यक्ष बंड्या सावंत, संध्या तेर्से, ज्येष्ठ नेते राजू राऊळ, मंडल अध्यक्ष संजय वेंगुर्लेकर, महिला मोर्चा अध्यक्षा आरती पाटील, मंडल उपाध्यक्ष राजा धुरी, जिल्हा कार्यकारिणी सदस्य आदिती सावंत, श्रीपाद तवटे, युवा मोर्चा अध्यक्ष तन्मय वालावलकर, शहर अध्यक्ष सुनील बांदेकर, मंडल उपाध्यक्ष विजय वारंग, माजी सभापती प्रतिभा घावनळकर, पंचायत समिती सदस्या अर्चना घावणळकर तसेच अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. गोशाळेचे संचालक आनंद वारंग यांनी उपस्थितांचे आभार मानून पालकमंत्री नितेश राणे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

error: Content is protected !!