ठळक घडामोडी

कुडाळ तालुका विज्ञान अध्यापक मंडळाच्या अध्यक्षपदी गिरीश गोसावी यांची निवड!

सावंतवाडीतील विज्ञान शिक्षक कार्यशाळेत निवडीची घोषणा

कुडाळ : प्रतिनिधी
     श्री पंचम खेमराज महाविद्यालय, सावंतवाडी येथे आयोजित ‘केमॲमेझ : क्रिएटिंग बॉण्ड विथ केमिस्ट्री’ या विज्ञान शिक्षक कार्यशाळेदरम्यान कुडाळ तालुका विज्ञान अध्यापक मंडळाच्या अध्यक्षपदी गिरीश गोसावी यांची निवड झाल्याची घोषणा करण्यात आली.
     आय.आय.टी. मद्रास, पुणे नॉलेज क्लस्टर फाऊंडेशन, पुणे आणि सिंधुदुर्ग जिल्हा विज्ञान मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने विज्ञान शिक्षकांसाठी या विशेष कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. विज्ञान अध्यापन अधिक प्रभावी करण्याबरोबरच प्रयोगशील अध्यापन, आधुनिक अध्यापन तंत्रे आणि विज्ञान विषयाबद्दल शिक्षकांमध्ये नवचैतन्य निर्माण करण्याच्या उद्देशाने ही कार्यशाळा पार पडली.
       कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी व व्यासपीठावर पुणे नॉलेज क्लस्टर फाऊंडेशनच्या प्रोजेक्ट मॅनेजर जान्हवी अगरवाल, शीतल नागपुरे, सावंतवाडीच्या नगराध्यक्षा युवराज्ञी श्रद्धाराजे भोसले, लखमसिंहराजे भोसले, सिंधुदुर्ग जिल्हा विज्ञान मंडळाचे अध्यक्ष पांडुरंग काकतकर, ऋषीकेश गावडे, संजय शेवाळे, राजाराम फर्जंद, रुपेश कर्पे, सौ. बांदेलकर, सौ. सावंत आदी मान्यवर उपस्थित होते.
     यावेळी कुडाळ तालुका विज्ञान अध्यापक मंडळाच्या अध्यक्षपदी गिरीश गोसावी यांची सर्वानुमते निवड जाहीर करण्यात आली. त्यांच्या निवडीबद्दल उपस्थित मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या. तालुक्यातील विज्ञान शिक्षकांना एकत्रित करून विज्ञान अध्यापन अधिक गुणवत्तापूर्ण, प्रयोगशील आणि विद्यार्थी-केंद्रित करण्यासाठी मंडळाच्या माध्यमातून विविध उपक्रम राबविण्याचा मानस यावेळी व्यक्त करण्यात आला. गिरीश गोसावी यांच्या निवडीमुळे कुडाळ तालुक्यातील विज्ञान शिक्षकांमध्ये समाधान व्यक्त होत असून विविध स्तरांतून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

error: Content is protected !!