ठळक घडामोडी

डेंग्यू-मलेरियासारख्या आजारांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कुडाळ नगरपंचायतीची डास प्रतिबंधात्मक फवारणी मोहीम!

सांगिर्डेवाडी प्रभागात आज डास प्रतिबंधक फवारणी

नागरिकांनी सहकार्य करण्याचे नगराध्यक्षा प्राजक्ता बांदेकर-शिरवलकर यांचे आवाहन

कुडाळ : प्रतिनिधी
     कुडाळ शहरात डेंग्यू, मलेरिया आणि इतर डासजन्य आजारांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कुडाळ नगरपंचायतीच्या वतीने डास प्रतिबंधक फॉगिंग मोहीम हाती घेण्यात आली असून, बुधवार दि. १५ जुलै २०२६ रोजी सांगिर्डेवाडी परिसरात विशेष फवारणी करण्यात येणार आहे.
     पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरातील विविध भागांत डासांची संख्या वाढत असल्याने नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने नगरपंचायतीच्या आरोग्य विभागाकडून ही मोहीम राबविण्यात येत आहे. डासांची उत्पत्ती रोखून डेंग्यू, मलेरिया आदी संसर्गजन्य आजारांवर नियंत्रण मिळविण्याचा यामागील उद्देश आहे.
     फवारणीच्या वेळी नागरिकांनी आवश्यक खबरदारी घ्यावी, घरातील खिडक्या व दरवाजे बंद ठेवावेत तसेच लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि पाळीव प्राण्यांची विशेष काळजी घ्यावी. तसेच ही मोहीम यशस्वी करण्यासाठी नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन कुडाळ नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा सौ. प्राजक्ता बांदेकर-शिरवलकर यांनी केले आहे. नगरपंचायत शहरातील नागरिकांच्या आरोग्याच्या संरक्षणासाठी सातत्याने उपाययोजना राबवत असून आगामी काळात इतर भागांतही फॉगिंग मोहीम सुरू ठेवण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली.

error: Content is protected !!