ठळक घडामोडी

कुडाळ सभापती मिलिंद नाईक, जि.प.सदस्य गंगाराम सडवेलकर शेतीच्या बांधावर!

मांडकुलीत ‘एक दिवस शेतीच्या बांधावर’ उपक्रमात प्रत्यक्ष सहभाग

शालेय विद्यार्थ्यांना शेतीची गोडी लावणारा नाविन्यपूर्ण उपक्रम

कुडाळ : प्रतिनिधी
      एक दिवस शेतीच्या बांधावर हा उपक्रम मांडकुली येथील जि.प.प्राथमिक शाळा नं.१ च्या वतीने आज राबविण्यात आला. या उपक्रमाला कुडाळ पंचायत समितीचे सभापती मिलिंद नाईक आणि पिंगुळी जि.प.सदस्य गंगाराम सडवेलकर यांनी भेट देऊन प्रत्यक्ष सहभागी झाले.
     शालेय मुलांना लहान वयापासून शेतीची आवड निर्माण व्हावी, शेतीबद्दल माहीती मिळावे या उद्देशाने बांधावरची शाळा हा नाविन्यपूर्ण उपक्रम प्रशालेच्या वतीने राबविण्यात आला. या उपक्रमात जि.प.सदस्य गंगाराम सडवेलकर यांनी भेट देऊन प्रत्यक्ष भात लावणीचा आनंद घेतला. कुडाळचे सभापती मिलिंद नाईक हेही या उपक्रमात प्रत्यक्ष सहभागी झाले. त्यांनी या उपक्रमाचे कौतुक केले. या वेळी दिलीप निचम, रिया परब, प्रमोद परब, सचिन साळसकर आदींसह शिक्षक, कृषी सहाय्यक, पालक व विद्यार्थी उपस्थित होते.

error: Content is protected !!