ठळक घडामोडी

अयोध्या येथील श्रीराम मंदिरातील कथित गैरव्यवहाराच्या निषेधार्थ कुडाळात महाआरती!

बाजारपेठेतील श्री देव मारुती मंदिरात ठाकरे शिवसेनेसह महाविकास आघाडीने केली महाआरती

मुख्य दोषींवर कारवाई होईपर्यंत आंदोलन सुरूच राहणार – जिल्हाप्रमुख वैभव नाईक

कुडाळ : प्रतिनिधी
       अयोध्या येथील राम मंदिराच्या दानपेटीतील गैरव्यवहाराच्या निषेधार्थ कुडाळ तालुका तालुका शिवसेना (उबाठा) पक्षासह महाविकास आघाडीने रविवारी सायंकाळी कुडाळ बाजारपेठ येथील श्री देव मारुती मंदिरात महाआरती केली. राम मंदिरातील कथित गैरव्यवहाराची सखोल चौकशी करुन मुख्य दोषींवर कारवाई व्हावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
       यावेळी ठाकरे शिवसेनेचे माजी आमदार तथा जिल्हाप्रमुख वैभव नाईक, तालुकाप्रमुख राजन नाईक, शहरप्रमुख संतोष शिरसाट, जि.प.सदस्य गंगाराम सडवेलकर, बाळा पावसकर, काँग्रेस तालुकाध्यक्ष अभय शिरसाट, उल्हास शिरसाट, मंदार चंद्रकांत शिरसाट, तरबेज शेख, संदेश पडते, बाळा वेंगुर्लेकर, संजय बोभाटे, नागेश जळवी, बंड्या कोरगावकर, शैलेश काळप, हर्षद काळप, गोट्या चव्हाण, गुरू गडकर आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
     यावेळेस बोलताना वैभव नाईक म्हणाले, गेल्या अनेक वर्षांपासून राम मंदिरासाठी आंदोलन सुरू असून प्रत्येक हिंदूच्या मनात श्रीरामाविषयी श्रद्धा आहे. श्रद्धेने भाविकांनी मंदिरासाठी हजारो कोटी रुपयांचे दान दिले. मात्र कथित गैरव्यवहारामुळे भाविकांच्या श्रद्धेचा बाजार मांडला गेला आहे. या प्रकरणातील प्रमुख संशयितांवर अद्याप कारवाई झालेली नाही. त्यामुळेच आज महाविकास आघाडीच्या वतीने आम्ही हे आंदोलन केले आहे. दोषींना शिक्षा होईपर्यंत आणि दानातील पैसा कुठे गेला याचा खुलासा होईपर्यंत आमचे आंदोलन सुरूच राहील,असे वैभव नाईक यांनी यावेळी सांगितले.

error: Content is protected !!