ठळक घडामोडी

कुडाळमध्ये शिंदे शिवसेनेच्या बाळा पावसकरांचा ठाकरे शिवसेनेत प्रवेश

जिल्हाप्रमुख तथा माजी आमदार वैभव नाईक यांच्या उपस्थितीत प्रवेश

बाळा पावसकर यांची तालुका प्रवक्ते पदी निवड

कुडाळ : प्रतिनिधी
     कुडाळ मधील शिंदे शिवसेनेचे जेष्ठ कार्यकर्ते बाळकृष्ण उर्फ बाळा पावसकर यांनी आज शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षात प्रवेश केला. बाळा पावसकर यांनी दोन वर्षांपूर्वी ठाकरे सेवेतून शिंदे सेनेत प्रवेश केला होता. मात्र, आज त्यांनी माजी आमदार तथा जिल्हाप्रमुख वैभव नाईक यांच्या मुख्य उपस्थितीत ठाकरे सेनेत प्रवेश केला. प्रवेशानंतर बाळा पावसकर यांची ठाकरे सेनेच्या कुडाळ तालुका प्रवक्ते पदी नियुक्ती करण्यात आली आहे.
     यावेळी उपजिल्हाप्रमुख अमरसेन सावंत, तालुकाप्रमुख राजन नाईक व कृष्णा धुरी, बबन बोभाटे, अतुल बंगे, योगेश धुरी, संतोष शिरसाट, शेखर गावडे, सुशिल चिंदरकर आदींसह शिवसैनिक उपस्थित होते.

error: Content is protected !!