ठळक घडामोडी

आपदग्रस्त वृद्ध महिलेच्या मदतीसाठी धावले कुडाळ सभापती!

मांडकुली येथे घरावर झाड कोसळून झाले होते नुकसान

सभापती मिलिंद नाईक यांनी पाहणी करीत शिवसेनेच्या माध्यमातून केले आर्थिक सहाय्य

कुडाळ : प्रतिनिधी
     मांडकुली नाईकवाडी येथील जानकी सावंत या वृद्ध महिलेच्या घरावर अलीकडील मुसळधार पावसामुळे झाड कोसळून घराचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. या घटनेची माहिती मिळताच कुडाळ पंचायत समितीचे सभापती मिलिंद नाईक यांनी आज घटनास्थळी भेट देऊन नुकसानग्रस्त घराची पाहणी केली.
     यावेळी त्यांनी जानकी सावंत यांची भेट घेऊन त्यांना धीर दिला तसेच शिवसेनेच्या वतीने आर्थिक मदतही सुपूर्द केली. नैसर्गिक आपत्तीमुळे अडचणीत सापडलेल्या कुटुंबाच्या पाठीशी शिवसेना कायम उभी राहील, अशी ग्वाहीही त्यांनी दिली.
यावेळी मांडकुली विभागप्रमुख दिलीप निचम, शाखाप्रमुख निलेश खानोलकर, विनोद नाईक, मेघू नाईक तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.

error: Content is protected !!