ठळक घडामोडी

संत राऊळ महाराज महाविद्यालयाच्या एनसीसी कॅडेट्सची सुवर्ण कामगिरी; तीन सुवर्णपदकांवर नाव कोरले!

पाच जिल्ह्यांच्या संयुक्त प्रशिक्षण शिबिरात कुडाळच्या कॅडेट्सचा दबदबा

सुवर्णपदकांसह चार कॅडेट्सची पुढील स्पर्धेसाठी निवड; महाविद्यालयाचा गौरव

कुडाळ : सुवर्ण पदक विजेत्या कॅडेटसोबत प्राचार्या डॅा.स्मिता सुरवसे व एन.सी.सी. विभाग प्रमुख कॅप्टन डॅा.एस.टी.आवटे.

कुडाळ : प्रतिनिधी
     ५७ महाराष्ट्र बटालियन सिंधुदुर्ग ओरस येथे पाच जिल्ह्यांच्या संयुक्त प्रशिक्षण शिबिरामध्ये कुडाळच्या संत राऊळ महाराज महाविद्यालयाच्या एन.सी.सी.कॅडेट्सनी एकूण तीन सुवर्णपदके पटकावली.
    महाविद्यालयाच्या एन.सी.सी.विभागाची विद्यार्थिनी कु. हर्षदा दीपक साळगावकर हिने ऑपस्टेकल ट्रेनिंग स्पर्धेत तर श्री. अनंत विजय शृंगारे यांनी जे. डी. एफ. एस. या स्पर्धेत आणि प्रतीक प्रजापती थोरात या विद्यार्थ्यांने मॅप रीडिंग या स्पर्धेत सुवर्णपदक प्राप्त केले. याचबरोबर रिया रामचंद्र परब, गंगाराम पांडुरंग भाईप, चंद्रकांत विलास राणे व गायत्री सुखदेव सांगोलकर या कॅडेट्सची पुढील स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे. सिंधुदुर्ग,कोल्हापूर, रत्नागिरी,सातारा आणि सांगली या जिल्ह्यातील कॅडेट्सनी या स्पर्धांमध्ये सहभाग घेतलेला होता. सुवर्णपदक विजेत्या  तसेच पुढील स्पर्धेसाठी निवड झालेल्या कॅडेट्सचे महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. स्मिता सुरवसे व एन.सी.विभाग प्रमुख कॅप्टन डॉ. एस.टी.आवटे यांनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

error: Content is protected !!