ठळक घडामोडी

आमदार निलेश राणे यांच्या प्रयत्नातून एसटी निवारा शेडसाठी १.२० कोटी मंजूर!

कुडाळ-मालवणमधील सहा मार्ग निवारा शेडचे होणार नूतनीकरण

जीर्ण एसटी शेडना मिळणार नवे रूप; निविदा प्रक्रिया अंतिम टप्यात

कुडाळ/मालवण : प्रतिनिधी
       गेली अनेक वर्षे नादुरुस्त असलेल्या महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या मार्ग निवारा शेड साठी आमदार निलेश राणे यांच्या प्रयत्नातून १ कोटी २० लाख एवढा निधी मंजूर करण्यात आला आहे. यात मालवण तालुक्यातील कट्टा, चौके, सुकळवाड तर कुडाळ तालुक्यातील आंब्रड, आवळेगाव, माणगाव या ठिकाणच्या जीर्ण व नादुरुस्त झालेल्या शेड साठी प्रत्येकी २० लाख या प्रमाणे एकूण १ कोटी २० लाख एवढा निधी पहिल्या टप्यात मंजूर झाला आहे. या कामाची प्रशासकीय मान्यता झाली असून निविदा प्रक्रिया अंतिम टप्यात आहे, लवकरच जुन्या शेड हटवून नवीन बांधकामाला सुरुवात होणार आहे.

error: Content is protected !!