ठळक घडामोडी

वेताळबांबर्डेत मुंबई-गोवा महामार्गावर अपघात!

दुचाकी – टेम्पो अपघात दुचाकीस्वार जखमी

कुडाळ : प्रतिनिधी
     मुंबई गोवा महामार्गावर वेताळ बांबर्डे – पावशी सीमेवर दुचाकी आणि छोटा टेम्पो यांच्या झालेल्या अपघातात दुचाकीस्वार जखमी झाला आहे. हा अपघात आज सकाळी ७.४५ च्या सुमारास घडला.
    प्राप्त माहितीनुसार, कुडाळच्या दिशेने जाणाऱ्या दुचाकीची टेम्पोला धडक बसली. यामध्ये दुचाकीस्वाराच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून उपचारासाठी त्याला तातडीने ओरोस येथील जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले आहे.

error: Content is protected !!