ठळक घडामोडी

मुंबई – गोवा महामार्गावर पावशी येथे अपघात!

अल्टो कार व जीप यांच्यात समोरासमोर धडक

एक गंभीर जखमी; कुडाळ पोलिसांची घटनास्थळी धाव

कुडाळ : प्रतिनिधी
     मुंबई – गोवा महामार्गावर पावशी बेलनदी जवळ आज दुपारी दोन वाजताच्या सुमारास भीषण अपघात झाला. या अपघातात कारचालक जखमी झाला आहे.
    अल्टो कार कणकवली हून गोवाच्या दिशेने जात होती तर विरुद्ध दिशेनी येणारी टाटा di जीप यांची समोरासमोर धडक बसली. या धडके मध्ये अल्टो कार चे मोठया प्रमाणात नुकसान झाले असून अल्टो कारचा चालक गंभीर रित्या जखमी झाला असून नजिकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघातादरम्यान महामार्गावरील एका लेनवरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. घटनास्थळी कुडाळ पोलीसांनी धाव घेत पुढील कार्यवाही सुरू केली. पुढील तपास कुडाळ पोलिस करीत आहे.

error: Content is protected !!