ठळक घडामोडी

आंबोली घाटात दरडीचे मोठे दगड कोसळले रस्त्यावर!

राष्ट्रीय महामार्ग विभागाची धाव; रस्त्यावरील दगड तातडीने हटवले

आंबोली घाटातील वाहतुक सुरळीत सुरू

सिंधुदुर्ग : प्रतिनिधी
      सततच्या कोसळत असलेल्या पावसाने आंबोली घाटातील साखळी क्रमांक 37/700 येथे आज मंगळवारी  (7 जुलै) सायंकाळी सुमारे 7.30 वाजण्याच्या दरम्यान दरडीतील काही मोठे दगड कोसळून रस्त्यावर आले. घटनेची माहिती मिळताच राष्ट्रीय महामार्ग उपविभाग, सावंतवाडीचे अधिकारी व कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले.
      राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या पथकाने यंत्रसामग्रीच्या सहाय्याने रस्त्यावर पडलेले दगड त्वरित हटविल्यामुळे घाटातील वाहतूक काही वेळातच पूर्ववत करण्यात आली. या घटनेत कोणतीही जीवित किंवा वित्तहानी झालेली नसून सध्या आंबोली घाटातील वाहतूक सुरळीत सुरू असल्याची माहिती सहाय्यक कार्यकारी अभियंता, राष्ट्रीय महामार्ग उपविभाग, सावंतवाडी यांनी दिली.

error: Content is protected !!