ठळक घडामोडी

कुडाळमध्ये पुरुषांची अनोखी ‘वटपौर्णिमा’ साजरी!

उमेश गाळवणकर मित्रमंडळाचा सलग १८ व्या वर्षी उपक्र

पत्नीप्रती आदर व्यक्त करत पुरुषांची वटपौर्णिमा; महिलांमध्येही वटपौर्णिमेचा उत्साह

कुडाळ : प्रतिनिधी
      कुडाळ येथील उमेश गाळवणकर मित्रमंडळ व डॉ. संजय निगुडकर यांच्या मित्रपरिवारातर्फे आज सोमवारी सकाळी येथील श्री गवळदेव येथे प्रतिवर्षाप्रमाणे पुरुषांची वटपौर्णिमा साजरी करण्यात आली. यावेळी पुरुष मंडळींनी एकत्र येत वडाच्या झाडाची पूजा करून वडाभोवती फेऱ्या मारत अनोख्या पद्धतीने वटपौर्णिमा साजरी केली. गेली १८ वर्षे हा उपक्रम अखंडपणे सुरू असून यंदाही तो उत्साहात पार पडला.
       पुरुषांच्या बरोबरीने पडद्यामागे राहून त्यांना सतत साथ देणाऱ्या पत्नींप्रती आदरभाव व्यक्त करणे, तसेच जन्मोजन्मी हीच पत्नी मिळावी आणि तिची साथ लाभावी या श्रद्धाभावातून हा उपक्रम राबविला जातो. या सामाजिक संदेश देणाऱ्या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे. यावेळी बॅ.नाथ पै शिक्षण संस्थेचे चेअरमन उमेश गाळवणकर, प्राचार्य अरूण मर्गज आदींसह नागरिक उपस्थित होते. दरम्यान महिलांमध्येही वटपौर्णिमेचा मोठा उत्साह पाहायला मिळत आहे.

error: Content is protected !!