
रक्तदान शिबीरासह विविध समाजोपयोगी उपक्रमांनी नव्या वर्षाची दमदार सुरुवात
शैक्षणिक मदत, पुरस्कार वितरण व सामाजिक योगदानातून रोटरी क्लबचा सेवाभावी संकल्प अधोरेखित
कुडाळ : प्रतिनिधी
दिनांक १ जुलै रोटरी क्लबच्या नवीन कार्यकारणीचा पहिला दिवस असतो. या दिवशी बुधवारी कुडाळ रोटरी क्लबच्या नवीन टीमने अध्यक्ष रो मकरंद नाईक सेक्रेटरी रो राकेश म्हाडदळकर खजिनदार म्हणून रो डॉ. जयश्री केसरे तसेच कुडाळ क्लबच्या संचालक मंडळातील विविध पदाधिकाऱ्यांनी पदग्रहण केले.
हा पदग्रहणाचा दिमाखदार कार्यक्रम काल बुधवारी सायंकाळी महालक्ष्मी हॉल कुडाळ येथे पदग्रहण अधिकारी रो.डॉ. सुहास जोशी (सांगली) यांच्या उपस्थितीत पार पडला. या पदग्रहण सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून असिस्टंट गव्हर्नर रो. संजय रावराणे हे देखील उपस्थित होते तसेच व्यासपीठावर डिस्ट्रिक्ट सेक्रेटरी रो .प्रणय तेली असिस्टंट गव्हर्नर रो. अभिषेक माने तसेच जिल्ह्याभरातून आलेल्या सर्व रोटरी क्लबचे पदाधिकारी सदस्य उपस्थित होते. खास करून कुडाळ पंचायत समितीचे सभापती मिलिंद नाईक देखील या सोहळ्यास उपस्थित होते.
अतिशय दिमाखदार पद्धतीने हा सोहळा संपन्न झाला. मावळते अध्यक्ष रो. राजीव पवार यांनी आपण वर्षभरात केलेल्या विविध उपक्रमाबद्दल माहिती दिली तसेच नवीन अध्यक्ष रो. मकरंद नाईक यांनी आपण पुढील वर्षभरात विविध उपक्रम राबविणार आणि कुडाळ रोटरी क्लबचे नाव अजून मोठ करणार याची ग्वाही दिली तसेच रोटरी अध्यक्ष म्हणून काम करण्याची संधी दिल्याबद्दल त्यांनी कुडाळ क्लबच्या सर्व सदस्यांचे मनापासून आभार व्यक्त केले.
दिवसभरात कुडाळ रोटरी क्लबने विविध उपक्रम राबवले. त्यात प्रामुख्याने कुडाळ क्लबच्या वतीने वतीने रक्तदान शिबिर घेण्यात आले. तसेच डॉक्टर्स डे च्या निमित्ताने विविध डॉक्टरांचा सन्मान करण्यात आला. यात प्रामुख्याने डॉ.जीटी राणे, डॉ. संजय केसरे, डॉ. जयश्री केसरे, डॉ.रवींद्र जोशी, डॉ. संजय सावंत, डॉ. शिल्पा पवार, डॉ.सायली प्रभू तसेच इतरही डॉक्टरांचा सहभाग होता तसेच चार्टर्ड अकाउंटंट डे च्या निमित्ताने सीए. गजानन प्रभू, सीए. सुनील सौदागर, सीए. सागर तेली, सीए.शैलेश मुंडे अशा विविध चार्टर्ड अकाउंटंट लोकांचा देखील सत्कार करण्यात आला.
या पदग्रहण सोहळ्याचे औचित्य साधून रोटरी क्लबच्या वतीने घावनळे खुटवळवाडी येथील कृष्णा बिले यांना रोटरी व्होकेशनल अवार्ड देण्यात आला,तसेच श्री कलेश्वर विद्यामंदिर नेरूरच्या मुख्याध्यापिका सौ.सुनीती नाईक मॅडम यांना कुडाळ रोटरी क्लबच्या वतीने ज्ञानज्योती अवार्ड देण्यात आला, तसेच या कार्यक्रमांमध्ये कुडाळ क्लबच्या वतीने ओरोस येतील डॉन बॉस्को शाळेसाठी दोन प्रिंटर भेट देण्यात आले, तसेच श्री लिंगेश्वर विद्यालय तुळसुली या शाळेमध्ये इयत्ता आठवी मध्ये शिकणाऱ्या सोनिया आनंद झोरे या मुलीला पुढील शिक्षणासाठी रोख रुपये 5000 ची आर्थिक मदत करण्यात आली. पावशी येथे राहणारे डॉ. बापू भोगटे यांना रोटरी विशेष पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. कुडाळ वासियांच्या सेवेत स्वखर्चाने वैकुंठ रथ समर्पित करणारे माजी नगराध्यक्ष रो.ओंकार तेली यांचाही विशेष सन्मान करण्यात आला.









