
भक्ष्याच्या शोधात बिबट्या पडला विहिरीत
घटनास्थळी संबंधित यंत्रणेसह ग्रामस्थांची धाव
कुडाळ : प्रतिनिधी
कुडाळ तालुक्यातील वेताळबांबर्डे नळ्याचापाचा येथे एका विहीरीत बिबट्या पडल्याची घटना शुक्रवारी सकाळी निदर्शनास आली. याबाबत स्थानिक ग्रामस्थांनी वनविभागासह संबंधित यंत्रणेला माहिती दिली. त्यानुसार संबंधित यंत्रणेकडून बिबट्याला रेस्कू करण्यासाठी पुढील कार्यवाही सुरू करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार; तेथील पानवलकर यांच्या घराशेजारी असलेल्या विहिरीत रात्रीच्या वेळी बिबट्या पडला. आज सकाळी ग्रामस्थांच्या निदर्शनास आल्यानंतर, बचावकार्य सुरू करण्यात आले आहे. बिबट्याला पाहण्यासाठी घटनास्थळी ग्रामस्थांची गर्दी झाली आहे.









