ठळक घडामोडी

कुडाळमधील रक्तदान शिबिराला रक्तदात्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद!

कै. देवेंद्र पडते स्मरणार्थ रक्तदान शिबिराचे आयोजन

बाजारपेठ मित्र मंडळाचा सामाजिक उपक्रम; ३५ जणांचे रक्तदान

कुडाळ : प्रतिनिधी
       कै. देवेंद्र संजय पडते यांच्या स्मरणार्थ बाजारपेठ मित्र मंडळ कुडाळआयोजित रक्तदान शिबिराला उस्फूर्त प्रतिसाद मिळाला. एकूण 35 रक्तदात्यांनी रक्तदान केले. आज हे शिबीर घेण्यात आले. दीपप्रज्वलनाने शिबिराची सुरूवात झाली. यावेळी व्यासपीठावर संजय पडते, प्रसाद रेगे, सौ.प्राजक्ता बांदेकर-शिरवलकर,  दीपक नारकर, रुपेश कानडे, ओंकार तेली, अरविंद करलकर, अभय शिरसाट, मंदार शिरसाट, द्वारकानाथ घुर्ये, श्रीराम शिरसाट, चेतन पडते , प्रथमेश पडते, शार्दुल घुर्ये, संदेश पडते, प्रसाद शिरसाट, नितीश म्हाडेश्वर, ऋषिकेश शिरसाट, सुमेध साळवी, मयूर शिरसाट, निलेश शिरसाट, ओंकार साळवी, दिनार पडते, भाऊ तोरसकर आदींसह मान्यवर उपस्थित होते.

error: Content is protected !!