
कुडाळ : प्रतिनिधी
सततच्या मुसळधार पावसामुळे चेंदवण येथील योगेश मेस्त्री व विजय मेस्त्री यांच्या घरावर झाड कोसळून नुकसान झाले. घटनेची माहिती मिळताच आज संबंधित ठिकाणी भाजप पदाधिकाऱ्यांनी भेट देऊन नुकसानग्रस्त घरांची पाहणी केली. यावेळी नुकसानग्रस्तांना धीर देण्यात आला. तसेच आवश्यक ती शासकीय मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील, असे आश्वासनही देण्यात आले. या प्रसंगी भाजपा जिल्हा सरचिटणीस रणजीत देसाई, भाजपा कुडाळ मंडळ अध्यक्ष संजय वेंगुर्लेकर, जिल्हा कार्यकारिणी सदस्य मोहन सावंत, भाजपा तालुका उपाध्यक्ष राजा धुरी यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.









