
युथ बिट्स फॉर क्लायमेट आणि इकोमोट्स ग्रुपचा उपक्रम
मालवण : प्रतिनिधी
वटपौर्णिमेच्या निमित्ताने आज ओझर विद्यामंदिर कांदळगाव परिसरात युथ बीट्स फॉर क्लायमेट आणि इकोमोट्स ग्रुपच्यावतीने प्रशालेच्या विद्यार्थ्यांमार्फत वटवृक्षाची लागवड करण्यात आली.
युथ बिट्स फॉर क्लायमेट या संस्थेकडून अनेक पर्यावरण पूरक उपक्रम राबविण्यात येतात. यावर्षी वटपौर्णिमेच्या निमित्ताने त्यांनी प्रशालेच्या विद्यार्थ्यांमार्फत वड, उंबर किंवा पिंपळ यापैकी एक झाड लावून ते झाड वाढविण्याची जबाबदारी विद्यार्थ्यांवर सोपवण्याचा एक अनोखा उपक्रम राबवला. ओझर विद्यामंदिर कांदळगाव प्रशालेच्या शालेय समितीचे अध्यक्ष किशोर नरे, मुख्याध्यापक डी. डी. जाधव, हरित सेना शिक्षक पी.आर. पारकर, पी. के. राणे, एस. जे. सावंत, एम.डी. परूळेकर, पी. व्ही. खोडके व प्रशालेच्या विद्यार्थ्यांनी या उपक्रमाला चांगले सहकार्य केले.
या कार्यक्रमप्रसंगी ‘युथ बिट्स फॉर क्लायमेट’ या संस्थेच्या चारुशिला देऊलकर,आशिष पेडणेकर,स्वाती पारकर, मेघल डिसोजा, दर्शन वेंगुर्लेकर, संजय परुळेकर, समिर वायंगणकर, राहूल जाधव, स्वप्निल गोसावी इ. सदस्य उपस्थित होते. चारुशीला देऊलकर व स्वप्निल गोसावी यांनी संस्थेच्या उपक्रमाविषयी व वृक्ष लागवडीचे महत्त्व विद्यार्थ्यांना सांगितले. ओझर विद्यामंदिर शाळेच्या परिसरात वृक्ष लागवड केल्याबद्दल प्रशालेचे मुख्याध्यापक डी. डी. जाधव यांनी युथ बिट्स फॉर क्लायमेट, इकोमोट्स ग्रुप आणि शाळेच्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.









