ठळक घडामोडी

नांदगावमध्ये भरदिवसा बंगल्यावर धाडसी चोरी; दोन मोबाईल, स्मार्ट वॉचसह रोकड लंपास!

मुंबई-गोवा महामार्गालगत चोरट्यांचा धुमाकूळ; बंद बंगल्याचे कुलूप तोडून ऐवज चोरला

हायवेलगत भरदिवसा चोरीने नांदगाव परिसरात खळबळ; कणकवली पोलिसांकडून तपास सुरू

कणकवली : प्रतिनिधी
      मुंबई-गोवा महामार्गावरील नांदगाव ओटव फाटा सर्व्हिस रोड लगत असलेला बंगला शुक्रवार दि. १७ रोजी ३ ते ५ या वेळेत नांदगाव हायवे लगत असलेला बंगला भर दिवसा फोडला असून काही रक्कम व दोन मोबाईल लंपास केले आहे. भर दिवसा हायवे लगत घडलेल्या चोरीच्या घटनेने नांदगाव येथे खळबळ उडाली आहे.
       मिळालेल्या माहितीनुसार, नांदगाव ओटव फाटा सर्व्हिस रोड लगत सदर बंगला आहे. सदर बंगला मालक हे काही दिवसापूर्वीच मुंबईवरून गावी आले होते. सध्या पावसाळा असल्याने ते सर्व सावडाव या धबधब्या ठिकाणी आज दुपारी अडीच ते तीनच्या सुमारास नांदगाव येथून गेले धबधब्याचा आनंद लुटून घरी येतात पाहिले असता तर बंगल्याच्या दाराची कडी तोडून दरवाजा उघडलेला होता आणि आत मध्ये सामान सर्व कपाट विस्कटलेले पाहायला मिळाले. त्यांनी सर्व साहित्य खातरजमा केली असता काही दोन ते तीन हजाराची रोख रक्कम आणि दोन मोबाईल सदर चोरांनी लंपास केल्याचे या बंगला मालकांच्या लक्षात आले. त्यांनी सदर माहिती कणकवली पोलीस ठाणे येथे दुरध्वनीद्वारे दिली आहे. याबाबत कणकवली पोलिसांकडून तपास सुरू करण्यात आला आहे.

error: Content is protected !!