ठळक घडामोडी

चेंदवण हायस्कूलमध्ये शिवसेनेतर्फे विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप!

आमदार निलेश राणे व जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या माध्यमातून उपक्रम

कुडाळ : प्रतिनिधी
     चेंदवण येथील कृषी मेळाव्यात शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी विद्यार्थ्यांना वह्या वाटप करण्याचे दिलेले आश्वासन अखेर पूर्ण करण्यात आले. आमदार निलेश राणे व शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या माध्यमातून गुरुवारी (२ जुलै) श्री देवी माऊली माध्यमिक विद्यालय, चेंदवण येथे विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप करण्यात आले.
     या कार्यक्रमाचा शुभारंभ माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संजय पडते आणि कुडाळ पंचायत समितीचे सभापती मिलिंद नाईक यांच्या हस्ते झाला. विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून त्यांच्या शिक्षणाला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला.
     यावेळी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख अरविंद करलकर, कुडाळ शिवसेना सचिव सुशील कदम, शाळा समिती अध्यक्ष तथा शिवसेना उपतालुकाप्रमुख देवेंद्र नाईक, संस्था सदस्य तथा माजी उपसरपंच रश्मी नाईक, शिवसेना पदाधिकारी जगदीप तुळसकर, शाखाप्रमुख राजू पोयरेकर, गटप्रमुख दादा ठुंबरे, युवा शाखाप्रमुख अभिलाष परब, ग्रामपंचायत सदस्य सायली नाईक, गटप्रमुख स्वप्नील चेंदवणकर यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते, ग्रामस्थ, पालक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गवस यांनी केले. विद्यालयाचे मुख्याध्यापक माणिक पवार यांनी प्रास्ताविक केले. यावेळी रश्मी नाईक, अरविंद करलकर, मिलिंद नाईक तसेच संजय पडते यांनी विद्यार्थ्यांना शिक्षणाचे महत्त्व सांगत मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे आभार संतोष सांगळे यांनी मानले.

error: Content is protected !!