
लॅबमधील साहित्य व उपकरणे जळाली
दोन फायर ब्रिगेड गाड्यांच्या मदतीने आग आटोक्यात
कुडाळ : प्रतिनिधी
कुडाळ शहरातील पानबाजार येथील क्षितिज अपार्टमेंट जवळच्या एका लॅबला आज सकाळी साडेसात वाजताच्या सुमारास अचानक आग लागल्याची घटना घडली. याबाबतची माहीती मिळताच कुडाळ नगरपंचायत आणि एमआयडीसीचा अग्निशमन बंब घटनास्थळी पाचारण करण्यात आले. या फायर ब्रिगेडच्या गाड्यांच्या मदतीने पाण्याचा मारा करून वेळीच आगीवर नियंत्रण मिळविण्यात आले. या आगीत कोणतीही जीवितहानी झालेली नाही मात्र लॅबमधील साहित्य, उपकरणे जळून मोठे नुकसान झाल्याची प्राथमिक माहीती मिळत आहे. मात्र आगीचे नेमके कारण समजू शकलेले नाही. घटनास्थळी नागरिकांचीही गर्दी झाली होती.









