ठळक घडामोडी

कुडाळ सभापती मिलिंद नाईक यांची अतिदुर्गम शाळांमध्ये सकाळीच हजेरी!

शिवापूर, वासोली व दुकानवाड शाळांना सभापतींची अचानक भेट

दुर्गम भागातील शिक्षण सुविधांची सभापती मिलिंद नाईक यांनी केली पाहणी

कुडाळ : प्रतिनिधी
        कुडाळ तालुक्यातील अतिदुर्गम भागातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक सुविधा आणि शाळांतील परिस्थितीची पाहणी करण्यासाठी कुडाळ पंचायत समितीचे सभापती मिलिंद नाईक यांनी आज शनिवारी सकाळी शिवापूर, वासोली क्रमांक १ आणि दुकानवाड येथील जिल्हा परिषद शाळांना अचानक भेटी दिल्या.
      सकाळी ९ वाजता सभापती मिलिंद नाईक यांनी शिवापूर शाळेत उपस्थित राहून शाळेची पाहणी केली. त्यानंतर वासोली क्रमांक १ आणि दुकानवाड येथील शाळांनाही भेट देत शिक्षक, विद्यार्थी आणि ग्रामस्थांशी संवाद साधला. शाळांतील मूलभूत सुविधा, विद्यार्थ्यांची उपस्थिती तसेच शैक्षणिक उपक्रमांची माहिती त्यांनी जाणून घेतली. यावेळी विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावे, शाळांमधील आवश्यक सुविधा उपलब्ध व्हाव्यात आणि दुर्गम भागातील विद्यार्थ्यांच्या अडचणी प्राधान्याने सोडविण्यासाठी प्रयत्न केले जातील, अशी ग्वाही सभापती मिलिंद नाईक यांनी दिली. पंचायत समिती सदस्या सौ. दिव्यानी दीपक खरात यांनीही विद्यार्थ्यांना नियमित शिक्षणाबरोबरच विविध उपक्रमांमध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले. यावेळी शिवापूर सरपंच सुमिता शेडगे, दिपक खरात, सुरेश धुमक, शाळा समिती पदाधिकारी, मुख्याध्यापक, शिक्षक, विद्यार्थी उपस्थित होते.

error: Content is protected !!