ठळक घडामोडी

पिंगुळीत मध्यरात्री झाड कोसळून रस्ता बंद!

तन्मय वालावलकरांसह ग्रामस्थांची धाव; जेसीबीच्या साहाय्याने रस्ता मोकळा

महावितरणच्या तत्परतेने वीजपुरवठाही झाला पूर्ववत

कुडाळ : प्रतिनिधी
     कुडाळ-वेंगुर्ला मार्गावरील पिंगळी येथे काल शुक्रवारी मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास एक मोठे झाड रस्त्यावर पडून रस्ता बंद झाला. या घटनेची माहिती मिळताच भाजप युवा मोर्चाचे कुडाळ तालुका अध्यक्ष तन्मय वालावलकर यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत रस्ता मोकळा करण्यासाठी पुढाकार घेतला. यावेळी अमोल चव्हाण, नितीन पिंगुळकर, अविनाश वाडेकर आणि विघ्नेश चव्हाण यांनी त्वरित जेसीबीसह घटनास्थळी पोहोचून झाड हटविण्याचे काम केले. त्यांनतर रस्ता वाहतूकीस मोकळा झाला. दरम्यान, झाड कोसळल्यामुळे काही भागातील वीजपुरवठाही खंडित झाला होता. याची दखल घेत महावितरणचे पराग वालावलकर यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन आवश्यक दुरुस्तीचे काम पूर्ण केले आणि वीजपुरवठा पूर्ववत केला.

error: Content is protected !!