

कुडाळ : प्रतिनिधी
वालावल प्राथमिक आरोग्य केंद्र येथे आज सकाळी जि.प.सदस्य रुपेश पावसकर यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून पल्स पोलिओ लसीकरणाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी पावसकर यांच्या हस्ते बालकांना पोलिओ डोस देण्यात आला.
यावेळी बोलताना रुपेश पावसकर यांनी आरोग्य केंद्र विभागातील एकही बालक पोलिओ डोस पासून वंचित राहता नये याची खबरदारी घ्यावी तसेच बाहेरगावी गेलेले पालक ग्रामस्थ यांच्याशी संपर्क साधून त्यांनी आपल्या बालकाला पोलिओ लसीकरण करून घेतले की नाही याची माहिती करून घ्यावी. पोलिओ मुक्त जिल्हा राहणे ही आपली सर्वांची जबाबदारी असून इतर आजारावर सुद्धा खबरदारी म्हणून अगोदरच उपाययोजना करा अशा सूचना देण्यात आल्या. यावेळी वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते









