ठळक घडामोडी

गणित प्रज्ञा परीक्षेचा निकाल जाहीर; सिंधुदुर्गातील विद्यार्थ्यांचे दैदीप्यमान यश!

५ विद्यार्थ्यांचे गोल्डन कॅटेगरीत मानाचे स्थान; ५३ गुणवंत विद्यार्थ्यांचा होणार गौरव

गणिताची आवड व बौद्धिक विकासासाठी जिल्हा गणित अध्यापक मंडळाचे उपक्रम ठरताहेत प्रेरणादायी

मालवण : प्रतिनिधी
     महाराष्ट्र गणित अध्यापक महामंडळाशी संलग्न सिंधुदुर्ग जिल्हा गणित अध्यापक मंडळ आयोजित  गणित प्रज्ञा परीक्षेचा निकाल जाहीर झाला. सिंधुदुर्ग जिल्हा गणित अध्यापक मंडळ  विद्यार्थ्यांमध्ये गणिताची आवड निर्माण करण्यासाठी व प्रज्ञावान विद्यार्थी शोधण्यासाठी विविध स्पर्धा परीक्षांचे आयोजन करते.या परीक्षा म्हणजे केवळ एका गुणाची चाचणी नसून वैचारिक स्पष्टता आणि बुद्धिमत्तेचा विकास घडविणारे महत्त्वाचे पाऊल आहे.
     सिंधुदुर्ग जिल्हा गणित अध्यापक मंडळ यांच्यामार्फत इयत्ता पाचवी व आठवी साठी  गणित संबोध परीक्षा, गणित प्रावीण्य परीक्षा, गणित प्रज्ञा परीक्षा तसेच इयत्ता दहावी साठी गणित पारंगत परीक्षा घेतल्या जातात .   
           सिंधुदुर्ग जिल्हा गणित मंडळामार्फत प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी गणित प्रावीण्य परीक्षेचे तसेच गणित प्रज्ञा परीक्षेमध्ये पात्र विद्यार्थ्यांसाठी जिल्ह्यातील एका केंद्रावर तज्ञ मार्गदर्शकां मार्फत गणित प्रज्ञा परीक्षेचे मार्गदर्शन केले जाते अशी माहिती सिंधुदुर्ग जिल्हा अध्यापक मंडळाचे अध्यक्ष प्रसाद कुबल यांनी दिली.
    सन 2025 -26 या वर्षीचा गणित प्रज्ञा परीक्षेचा निकाल आताच जाहीर झाला. यामध्ये पाचवीतील पाच विद्यार्थ्यांचा गोल्डन कॅटेगिरी मध्ये गुणवत्ता यादीत समावेश झाला.तर इयत्ता पाचवी व आठवीतील एकूण 48 विद्यार्थ्यांचा सिल्वर कॅटेगिरी मधील गुणवत्ता यादीमध्ये समावेश झाला.
        पाचवीतील पदक व शिष्यवृत्तीधारक (गोल्डन कॅटेगरी) मध्ये समावेश असलेले विद्यार्थी
पियुष विजय लाड ( जि. प. प्राथमिक शाळा नेरुर शिरसोस ), सोहम योगेंद्र धामापूरकर ( अ. शि दे.टोपीवाला हायस्कूल मालवण ), उर्वी दत्तात्रय आठलेकर ( जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा सावंतवाडी नं. 4), राजनंदिनी चंद्रशेखर सावंत ( जि प. पू. प्रा. शाळा सावंतवाडी नं 4), पार्थ पंडित तेली ( विद्या मंदिर माध्यमिक प्रशाला कणकवली ).
        इयत्ता पाचवीमधील गुणवत्ता पात्र
( सिल्वर कॅटेगिरी ) मध्ये समावेश असलेले विद्यार्थी
अनुप्रिया अजित राणे ( जि. प. पू. प्राथमिक शाळा सावंतवाडी नं 4), गार्गी भालचंद्र आजगावकर( कुडाळ एमआयडीसी कुंभारवाडा ), मीरा महादेव सामंत ( एस एल देसाई विद्यालय पाट ), केणी कथित शशांक ( इंग्लिश मीडियम स्कूल कुडाळ ), मधुरा दीपक मिठबांवकर ( अ.शि.दे टोपीवाला हायस्कूल मालवण )
प्राजक्ता रामचंद्र शृंगारे ( जि. प. पू. प्राथमिक शाळा नेरूर शिरसोस ), जान्हवी निलेश तळगांवकर (अ.शि.दे टोपीवाला हायस्कूल मालवण ), सावली शेखर सामंत ( कुडाळ हायस्कूल कुडाळ ), उर्वी अमितकुमार टक्केकर ( जि. प. पू. प्राथमिक शाळा सावंतवाडी नं 4), आयुष उमेश भोई ( कुडाळ एमआयडीसी कुंभारवाडा ), जय निवास सातार्डेकर ( बॅ. नाथ पै  विद्यालय कुडाळ ), शुभम मिलिंद परुळेकर (जि. प.  केंद्रशाळा परुळे नं. 3 ), रुद्र तुकाराम परब ( शांतिनिकेतन स्कूल सावंतवाडी ), श्रिया प्रवीण गोवेकर ( झाराप कांबळेवीर कुडाळ ), श्रीकर मंदार शुक्ला (जि. प. पू. प्राथमिक शाळा सावंतवाडी नं 2), स्पृहा संदेश नाईक ( एस एल देसाई विद्यालय पाट ), प्रणिल सीताराम आडारकर ( लक्ष्मी नारायण विद्यालय बिबवणे ), वेदांत विजय साठे (जि. प. पू. प्राथमिक शाळा कुसबे ), नागेंद्र युवराज तारी ( भंडारी हायस्कूल मालवण ), रुद्र राहुल कानडे ( कुडाळ हायस्कूल कुडाळ ), राघव भारत राऊळ (जि. प. शाळा माडखोल मेटवाडी 3), रुद्र अभिषेक देसाई ( मिलाग्रीस हायस्कूल सावंतवाडी ), यश प्रवीण सावंत ( मदर क्वीन इंग्लिश स्कूल सावंतवाडी), आविष्कार चंद्रकांत कदम ( बॅ. नाथ पै विद्यालय कुडाळ ).
        इयत्ता आठवी मधील गुणवत्ता पात्र
( सिल्वर कॅटेगिरी ) मध्ये समावेश असलेले विद्यार्थी
कर्तव्य तेजस बांदिवडेकर ( आर.पी.डी हायस्कूल सावंतवाडी ), करिष्मा पंकज मांजरेकर ( मदर क्वीन स्कूल सावंतवाडी ), दुर्वा निलेश धुरी ( साळगाव हायस्कूल कुडाळ ), पार्थ जयंत वझे ( कुडाळ हायस्कूल कुडाळ ), दुर्वांक किशोर वालावलकर ( कळसुलकर हायस्कूल सावंतवाडी ), वेद राजेंद्र जोशी ( श्रीराम माध्यमिक विद्यामंदिर पडेल देवगड ), रितेश शैलेश पंधारे ( उमा मिलिंद पवार हायस्कूल देवगड ), आदिनाथ दत्तप्रसाद सामंत ( अण्णासाहेब देसाई विद्यामंदिर परुळे ), शुभंकर सुदीप पाटकर ( मिलाग्रीस हायस्कूल सावंतवाडी ), विश्वराज विजयसिंह सातपुते ( एस एम हायस्कूल कणकवली ), नाईक स्वराज भालचंद्र ( इंग्लिश मीडियम स्कूल कुडाळ ), रिया धनंजय परब ( कुडाळ हायस्कूल कुडाळ ), चैतन्य सुहास परुळेकर ( अण्णासाहेब देसाई विद्या मंदिर परुळे ), आंचल अशोक देसाई ( मुटाट हायस्कूल देवगड ), वालावलकर सिया रघुनाथ ( इंग्लिश मीडियम स्कूल कुडाळ ), संस्कृती सुदेश चिपकर ( न्यू इंग्लिश स्कूल उभादांडा वेंगुर्ला ), संस्कृती अशोक गावडे ( पणदूर हायस्कूल कुडाळ ), सर्वज्ञा सतीश गोठणकर ( बॅ. नाथ पै विद्यालय कुडाळ ), मैथिली संतोष पवार ( कुडाळ हायस्कूल कुडाळ ), अर्णव जयवंत रावण ( एस एम हायस्कूल कणकवली ), जानवी सुरेश गवंडे ( मिलाग्रीस हायस्कूल सावंतवाडी ), गौरी रत्नाकांत उदीगरे ( न्यू इंग्लिश स्कूल आचरा मालवण ), गार्गी राजेश परब ( कळसुलकर हायस्कूल सावंतवाडी ), ओराई नारायण पंडित ( बॅ.नाथ पै विद्यालय कुडाळ ).
     सिंधुदुर्ग जिल्हा गणित अध्यापक मंडळ आयोजित गुणगौरव कार्यक्रमात सर्व गुणवत्ताधारक 53 विद्यार्थ्यांचा सर्टिफिकेट व ट्रॉफी देऊन सत्कार करण्यात येणार आहे. सिंधुदुर्ग जिल्हा गणित अध्यापक मंडळाचे अध्यक्ष प्रसाद कुबल, कार्यवाह धोंडी गावडे, जिल्हा परीक्षा प्रमुख महेश चव्हाण, उपाध्यक्ष सुशीलकुमार कडुलकर रामचंद्र भानुसे,प्रसाद पारकर, महामंडळ प्रतिनिधी भाऊसाहेब चवरे,राजाराम फर्जंद, व सल्लागार औदुंबर भागवत,वामन खोत, व तुकाराम पेडणेकर तसेच सर्व जिल्हा व तालुका कार्यकारणी सदस्य यांनी राज्य गुणवत्ता यादीत स्थान मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

error: Content is protected !!