
लाजरी क्रिकेट ग्रुप आयोजित मान्सून महोत्सवाचे १४ वे वर्ष
संयुक्त दशावतारचे ‘वीरभक्त तरणीसेन’ आणि ‘रावण-मंदोदरी विवाह’ नाट्यप्रयोग
कुडाळ : प्रतिनिधी
लाजरी क्रिकेट ग्रुप, कुडाळच्या वतीने यंदा शनिवार दि.१५ व रविवार दि.१६ ऑगस्ट रोजी ‘मान्सून महोत्सव २०२६’ चे आयोजन कुडाळ मधील सिद्धिविनायक हाॅल (रेल्वेस्टेशन रोड) येथे करण्यात आले आहे. या महोत्सवात संयुक्त दशावतारचे ‘वीरभक्त तरणीसेन’ आणि रावण ‘मंदोदरी विवाह’ या दोन पौराणिक नाट्य प्रयोगांचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आघाडीच्या दशावतारी कलाकारांचा सहभाग असणार आहे.
या महोत्सवाचे यंदाचे १४ वे वर्ष आहे. हा महोत्सव १५ व १६ ऑगस्ट रोजी सायंकाळी ६.३० वाजता होणार आहे. शनिवार, १५ ऑगस्ट रोजी ‘वीरभक्त तरणीसेन’, तर रविवार, १६ ऑगस्ट रोजी ‘रावण-मंदोदरी विवाह’ हे पौराणिक दशावतार नाट्यप्रयोग सादर होणार आहेत. या दोन्ही नाटकांची कथा व संकल्पना अजित गाडगीळ (मळेवाड) यांची असून, रसिकांना दर्जेदार पौराणिक नाट्यकलेची पर्वणी अनुभवायला मिळणार आहे. या महोत्सवाला सर्वानी उपस्थित राहून नाट्यप्रयोगांचा आस्वाद घ्यावा असे आवाहन लाजरी क्रिकेट ग्रुपचे अध्यक्ष राजू पाटणकर व राजेश म्हाडेश्वर यांनी केले आहे.









