ठळक घडामोडी

मोर्लेत १५ फुटी अजगराचा थरार; कुत्र्यासह चार पिल्ले गिळंकृत!

मांगरात शिरलेला अजगर वनविभागाकडून यशस्वी रेस्क्यू

अजगर पकडून नैसर्गिक अधिवासात सोडला

दोडामार्ग : प्रतिनिधी
     दोडामार्ग तालुक्यातील मोर्ले येथील पंकज गवस यांच्या मांगरात आलेल्या 15 फुटी अजस्त्र अजगराने एक कुत्रा व 4 पिल्ले मिळून कुत्र्यांना गिळंत करून आरामात निपचित होता. यावेळी वनविभागाने ग्रामस्थांच्या मदतीने रेस्क्यू करून नैसर्गिक अधिवासात सोडले.
     मिळालेल्या माहितीनुसार, मोर्ले येथील पंकज गवस यांच्या मांगरात एक कुत्रा व त्याची 4 पिल्ले होती. यावेळी उपाशी असलेला एक 15 फुटी अजगर त्या मांगरात गेला त्यावेळी त्या अजगराने त्या ठिकाणी असलेल्या एका मोठा कुत्रा व लहान 4 पिल्ले गिळली. सकाळी कुत्र्याची लहान पिल्ले कुठे दिसली नाही म्हणून पंकज याने आजूबाजूला शोधा शोध केला. त्यावेळी मांगरात एक भला मोठा अजगर निदर्शनास आला. त्या अजगराने काही तरी खाल्याचे निदर्शनास आले. हि घटना गावात वाऱ्या सारखी पसरली अजगराला पाहण्यासाठी बघ्यानी मोठी गर्दी केली. यावेळी वनविभागाला यां घटनेची माहिती दिली वनविभागा घटना स्थळी दाखल होऊन त्या अजस्त्र अजगरला पकडून नैसर्गिक अधिवासात सोडले.

error: Content is protected !!